virender sehwag  File Photo
क्रीडा

सेहवागनं शेअर केला नंबर; कॉल करण्यासाठी चाहत्यांची उडाली धांदल

सुशांत जाधव

भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटर सध्या सोशल मीडियावरील बोलंदाजीमुळे चर्चेत असतो. मजेदार पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांचे मनोरंजन करणाऱ्या सेहवागच्या एका ट्विटने सध्या सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय. फोन नादुरुस्त झाल्याचे सांगत त्याने पर्यायी नंबरच आपल्या ट्विटमधून शेअर केलाय.

मंगळवारी विरेंद्र सेहवागने केलेल्या ट्विटमध्ये लिहिलंय की, 'माझा फोन पाण्यामध्ये पडलाय. जोपर्यंत फोन ठिक होत नाही तोपर्यंत तुम्ही 9112083319 या क्रमांकावर कॉल करु शकता. या ट्विटरवर कमेंट्सची बरसात होताना दिसत आहे. ही पोस्ट वाचून काही चाहत्यांचा गोंधळ उडल्याचेही दिसते. सेहवागचे अकाउंट हॅक झालेय का? असा प्रश्न काहींना पडलाय.

काही चाहते सेहवागने शेअर केलेल्या नंबर त्याच्या खेळीशी निगडीत असल्याचा तर्क लावत आहेत. सेहवागने जो नंबर शेअर केलाय त्याच्या अखेरीस 319 असे अंक आहेत. ही सेहवागच्या कारकिर्दीतील सर्वोच्च खेळी आहे. नंबरमधील 83 हा आकडा देखील खास आहे. 2003 च्या वर्ल्ड कपस्पर्धेतील फायनलमध्ये त्याने 83 धावांची खेळी केली होती. त्यामुळेच सेहवागच्या या ट्विटवर चांगलीच चर्चा सोशल मीडियावर रंगताना दिसतेय. विशेष म्हणजे सेहवागने ट्विटरसह फेसबुकच्या माध्यमातूनही ही पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळे त्याचे अकाउंट हॅक झाल्याचा अंदाज बांधणेही चुकीचे ठरते.

काही चाहत्यांनी तर सेहवागने दिलेल्या नंबरवर कॉल करण्यास सुरुवात केलीये. अनेकजण याचे स्क्रिनशॉट शेअर करत आहेत. मात्र कोणीही सेहवागशी संवाद झाल्याचा दावा अद्याप केलेला नाही. सेहवागच्या या ट्विटचं राज नेमक काय यासाठी बहुदा त्याच्या पुढच्या पोस्टचीच वाट पाहावी लागले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विजय शंकरसह ३ भारतीय खेळाडू खेळणार Afghanistan Premier League? ड्राफ्टमध्ये २९ पाकिस्तानी अन् १० बांगलादेशी खेळाडूंचाही समावेश

'महाराजांचे गडकिल्ले, जंगलं आणि डोंगर धोक्यात'; सयाजी शिंदेंचा संतापले, सह्याद्री वाचवण्यासाठी सुरू केली मोठी चळवळ

Latest Marathi News Live Update : शरद पवार पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल; सुप्रिया सुळेंनी दिली माहिती

''उमर अब्दुल्ला आणि निधी राजदान यांचा विवाह शरिया कायद्यानुसार बेकायदेशीर'', 'ऑल इंडिया मुस्लिम जमात'चा आक्षेप

Chhatrapati Shahaji Raje and Sambhaji Maharaj Samadhi Controversy : छत्रपती शहाजीराजे भोसले व थोरले संभाजी महाराज यांच्या समाधीस्थळी मेघडंबऱ्या उभारणाऱ्या महाराष्ट्रातील शिवप्रेमींवर कर्नाटक पोलिसांकडून गुन्हे दाखल

SCROLL FOR NEXT