Virat Kohli Steps Down as Test Captain esakal
क्रीडा

'मी माझ्या संघाशी अप्रामाणिक...' कोहलीने पत्रातून मांडली आपबीती

सुशांत जाधव

दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या कसोटी मालिकेतील टीम इंडिच्याच्या पराभवानंतर विराट कोहलीने मोठा निर्णय घेतला आहे. त्याने कसोटी संघाच्या नेतृत्वाचा राजीनामा दिला आहे. याआधी कोहलीने टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी टी-20 संघाचे नेतृत्व सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्याच्या या निर्णयामुळे त्याने वन-डेचे कर्णधारपद गमावले.

किमान कसोटी संघाच्या नेतृत्वपदी तरी आणखी काही वेळ तो संघाची धूरा सांभाळेल, असे वाटत होते. पण अखेर त्याने अचानकपणे कसोटी संघाचे नेतृत्व सोडण्याचा निर्णय जाहीर केला आहे. विराट कोहलीच्या या निर्णयामुळे भारतीय क्रिकेटमध्ये अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे. (Cricketer Virat Kohli steps down as India Test captain)

विराट कोहलीने (Virat Kohli) सोशल मीडियाच्या माध्यमातून यासंदर्भातील माहिती दिली. 7 वर्षांच्या कालावधीत संघाला योग्य दिशा देण्यासाठी सर्वोत्तपरी प्रयत्न केला. संघाचे नेतृत्व करत असताना प्रामाणिकपणे काम केले. या कालावधीमध्ये बऱ्याचदा चढउताराचा सामना करावा लागला. पण प्रयत्न थांबवले नाहीत. 120 टक्के देऊन हातातील काम तडीस नेण्याचा कटिबद्धता दाखवली. बीसीसीआयचेही त्याने आभार मानले आहेत.

त्याने जे निवेदन शेअर केले आहे त्यात माजी प्रशिक्षिक रवि शास्त्री (Ravi Shastri) आणि माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) यांच्या नावाचाही समावेश दिसून येतो. कॅप्टन्सीसाठी माही भाईने माझ्यावर विश्वास टाकला, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती, असेही विराटने म्हटले आहे. माझ्या संघाशी मी अप्रामाणिक असू शकत नाही. माझ्या मनात सर्व गोष्टींबद्दल स्पष्टता आहे, असं कोहलीने म्हटलंय.

महेंद्रसिंह धोनी याच्यानंतर 2014 मध्ये विराट कोहली टीम इंडियाचा कर्णधार झाला. त्याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने क्रिकेट जगतात बहरदार कामगिरी नोदंवली. सर्वाधिक यशस्वी कर्णधारामध्ये तो धोनीच्याही पुढे निघून गेला. पण आयसीसीच्या स्पर्धेत त्याला यश मिळाले नाही. टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी विराट कोहलीने टी-20 संघाचे नेतृत्व सोडण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्याने वर्कलोड असल्याचा दाखला दिला होता. त्याच्या या निर्णयानंतर बीसीसीआयने त्याला दणका दिला. त्याचे वनडे संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे देण्यात आले होते.

वनडेमध्ये झालेला बदल हा विराटच्या विरोधातील होता. पण त्याने तो मान्य केला. दक्षिण आफ्रिकेतील कसोटीनंतर तो असा काही निर्णय घेईल, असे वाटले नव्हते. पण अखेर त्याने कॅप्टन्सीतून मुक्त व्हायचे ठरवले आहे. आता हा निर्णय त्याचा आहे की बीसीसीआयच्या दबावातून त्याने नेतृत्व सोडलं याचं उत्तर येणारा काळ देईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Mega Bharti: ‘एमपीएससी’कडून २,६१९ पदांसाठी मेगाभरती; गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा, २७ जून ते १७ जुलै करा ऑनलाइन अर्ज..

IND vs IRE 1st T20I: १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचा 'डेब्यू' होणार? पहिल्या टी-२० साठी टीम इंडियाची अशी असेल Playing XI

Ketan Agarwal Murder Case : ... तर तिलाही त्याच किल्ल्यावरुन ढकलून द्या, सियाच्या वडिलांची धक्कादायक मागणी

‘टीईटी’ रविवारी! २० मिनिटे आधी केंद्रावर न पोहचलेल्या परीक्षार्थींना ‘टीईटी’साठी नो एंट्री; ‘या’ पाचपैकी एक ओरिजनल ओळखपत्र सोबत आणण्याचे बंधन, वाचा...

Protein-Rich Moong Makhana Chaat: रोजच्या बोरींग नाश्त्याला द्या ब्रेक! 10 मिनिटांत तयार करा हा प्रोटीनयुक्त मूग-मखाना चाट

SCROLL FOR NEXT