Cristiano Ronaldo Retirement esakal
क्रीडा

Cristiano Ronaldo : रोनाल्डो निवृत्ती घेणार; मुलाखतीत मेस्सीबद्दल काय म्हणाला?

अनिरुद्ध संकपाळ

Cristiano Ronaldo Retirement : पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तीयानो रोनाल्डो सध्या चांगलाच चर्चेत आहे. मँचेस्टर युनायटेडबरोबर सुरू असलेल्या वादावर रोनाल्डोने कतार वर्ल्डकप सुरू होण्यापूर्वीच भाष्य करत मोठी खळबळ उडवून दिली होती. आता या मुलाखतीचा दुसरा भाग प्रसिद्ध झाला आहे. या भागात ख्रिस्तीयानो रोनाल्डोला त्याचा प्रतिस्पर्धी लिओनेल मेस्सी संदर्भात एक मजेदार प्रश्न ब्रिटीश पत्रकार मॉर्गन यांनी विचारला. यावर रोनाल्डोने थेट निवृत्तीचीच भाषा केली.

मॉर्गन यांनी रोनाल्डोसमोर एक परिस्थिती निर्माण केली. मॉर्गन म्हणाले की, टजर पोर्तुगाल फिफा वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत दाखल झाला. त्यांचा सामना अर्जेंटिनाशी होणार आहे. तू सामन्यात दोन गोल केलेस. त्यानंतर मेस्सीने दोन गोल करत बरोबरी केली. सामन्याच्या 94 व्या मिनिटाला तू गोलची हॅट्ट्रिक साधलीस आणि पोर्तुगाल वर्ल्डकप जिंकला.'

या स्वप्नातील कल्पनेवर रोनाल्डो म्हणाला की हे खूप भारी आहे. रोनाल्डो पुढे म्हणाला की, मैदानावर जरी पोर्तुगालच्या गोलकिपरने जरी गोल केला आणि माझा संघ जिंकला तरी मी जगातील सर्वात आनंदी व्यक्ती असेन. दरम्यान, रोनाल्डोने मॉर्गन यांच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाला की, 'जर असं झालं तर मी फुटबॉलमधून निवृत्ती घेईन.'

रोनाल्डोने निवृत्ती घेण्याचे वक्तव्य गमंतीने केले. या मुलाखतीत रोनाल्डोने मेस्सीची स्तुती देखील केली. गेल्या 15 वर्षात मेस्सी आणि रोनाल्डो हे फुटबॉल जगतावर अधिराज्य गाजवणारे दोन खेळाडू ठरले आहेत. दरम्यान, रोनाल्डो त्याच्या निवृत्तीबाबत काय प्लॅन्स आहे हे सांगताना म्हणाला की तो वयाच्या 40 व्या वर्षापर्यंत फुटबॉल खेळण्यास उत्सुक आहे.

रोनाल्डो त्याच्या निवृत्तीबाबत म्हणाला की, 'मी अजून दोन ते तीन वर्षे तरी फुटबॉल खेळू इच्छितो. मला माझी फुटबॉल कारकिर्द ही वयाच्या 40 व्या वर्षी संपवायची आहे. मला वाटते की यासाठी 40 हे योग्य वय आहे. मात्र भविष्याबद्दल मी आताच काही सांगू शकत नाही. तुम्ही तुमच्या आयुष्यात काही प्लॅन्स केलेले असतात मात्र आयुष्य बदलत असतं तुम्हाला काय होईल हे माहिती नसतं.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

WhatsApp चं Username फीचर वादाच्या भोवऱ्यात, केंद्र सरकारने थेट Meta ला पाठवली नोटीस, तीन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

Raigad Accident: पालीत मोठा अनर्थ टळला! खड्ड्यांमुळे एसटी बस रस्त्याखाली घसरली; चालकाच्या प्रसंगावधानाने ४२ प्रवाशांचे प्राण वाचले

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

SCROLL FOR NEXT