Cristiano Ronaldo Pune Balewadi  ESAKAL
क्रीडा

Cristiano Ronaldo : पुणेकरांना मिळणार रोनाल्डोला पाहण्याची सुवर्णसंधी; बालेवाडी स्टेडियमवर होणार सामना?

अनिरुद्ध संकपाळ

Cristiano Ronaldo Pune Balewadi : पुणेकरांना रोनाल्डोचा सामना पुण्यात पाहण्याची सुवर्ण संधी मिळण्याची शक्यता आहे. एएफसी चॅम्पियन्स लीगच्या प्ले ऑफमध्ये रोनाल्डोच्या एल नासर फुटबॉल क्लबने दुबईचा क्लब शबाब अल अहलीचा 4 - 2 असा पराभव केला. या विजयाबरोबरच अल नासर ने 2023 - 24 एएफसी चॅम्पियन्स लीगमधील आपला प्रवेश निश्चित केला आहे. त्यामुळे त्यांचा सामना मुंबई सिटी एफसी विरूद्ध होण्याची शक्यता आहे.

अल नासर क्लबच्या अँडरसनने सुरूवातीलाच पहिला गोल केला होता. मात्र सौदीच्या तगड्या संघाला मोठा धक्का बसला. घसानीने 18 आणि 46 व्या मिनिटाला दोन करत आघाडी घेतली. पिछाडीवर पडलेल्या नासरसाठी अखेर 88 व्या मिनिटाला सुल्तान बिन अब्दुल्ला धावून आला. त्याने गोल करत बरोबरी साधली. यानंतर टालिस्का आणि मार्सेलो ब्रोझोविक यांनी एक्स्ट्रा टाईममध्ये गोल करत अल नासरला विजय मिळवून दिला.

या विजयानंतर अल नासरने एएफसी चॅम्पियन्स लीग 2023 - 24 च्या हंगामासाठी पात्र झाला आहे. त्यांचा संघ वेस्ट झोनच्या पॉट 4 मध्ये असण्याची शक्यता आहे. या पॉटमध्ये गतविजेते अल अिन एफसी क्लब देखील आहे.

जर सर्व गोष्टी जुळून आल्या तर रोनाल्डो हा मुंबई सिटी एफसी क्लबविरूद्ध देखील खेळू शकतो. हा सामना पुण्यातील श्री शिवछत्रपती बालेवाडी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मध्ये होण्याची शक्यता आहे. हा भारताचा चॅम्पियन्स लीग मधील एकमेव फुटबॉल क्लब आहे. पुण्यातील बालेवाडी हे त्यांचे होम ग्राऊंड आहे.

जर ड्रॉमध्ये दोन्ही संघ एकाच ग्रुपमध्ये आले तर नक्कीच रोनाल्डो मुंबई सिटी एफसी विरूद्ध खेळेल. मुंबईचा संघ वेस्ट झोनमध्ये आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Sugarcane Price Protest : सांगली जिल्ह्यात ऊसदराचे आंदोलन पेटले, आमदार अतुल भोसलेंच्या कारखाना राजू शेट्टींच्या सहकाऱ्यांनी पाडला बंद, आंदोलन चिघळण्याची शक्यता

India A vs Australia A, ODI: भारतीय संघाने व्हाईटवॉश टाळला! ऑस्ट्रेलियाला शेवटच्या सामन्यात पराभवाची धूळ चारली

Supreme Court March : राहुल गांधींनी व्हिडिओ शेअर करत दिली देशवासियांना 'चलो दिल्ली'ची हाक; सरन्यायाधीशांकडे दाद मागणार

Mumbai Protest: मुंबईत वातावरण तापलं, ठाकरे कुटुंब पोलीस स्थानकात; व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

SCROLL FOR NEXT