CSK Chanting By Fans During 4th T20I India vs South Africa Match Chennai Super Kings Share Video
CSK Chanting By Fans During 4th T20I India vs South Africa Match Chennai Super Kings Share Video esakal
क्रीडा

VIDEO : सामना टीम इंडियाचा, चोपतोय डीके; आवाज मात्र 'सीएसके'चा

अनिरुद्ध संकपाळ

राजकोट : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा टी 20 सामना राजकोट येथे पार पडला. मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी लढणाऱ्या टीम इंडियाने राजकोट राखलं. या सामन्यात भारताची ओल्ड गन दिनेश कार्तिक चांगलीच धडाडली. त्याने 55 धावांची आक्रमक अर्धशतकी खेळी करत संघाला 170 पर्यंत पोहचवण्यात मोठे योगदान दिले. हार्दिकनेही 46 धावांची खेळी करत त्याला उत्तम साथ दिली. मात्र असे असले तरी सामना सुरू असताना प्रेक्षकांमधून एक अजब घोषणाबाजी सुरू झाली. राजकोटच्या स्टेडियममधून सीएसके सीएसकेच्या घोषणा ऐकू येऊ लागल्या. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. (CSK Chanting By Fans During 4th T20I India vs South Africa Match Chennai Super Kings Share Video)

जरी आयपीएलचा 15 वा हंगाम संपून जवळपास 15 दिवस उलटून गेले असले तरी आयपीएलचा फिव्हर काही अजून उतरलेला नाही. याची प्रचिती भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथ्या सामन्यात आली. राजकोटच्या मैदानात बसलेल्या भारतीय प्रेक्षकांनी अचानक इंडिया इंडिया ऐवजी सीएसके सीएसके अशी घोषणाबाजी सुरू केली. याचा व्हिजिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत अनेक चाहत्यांनी सीएसकेची जर्सी घातली असल्याचे दिसून येते. यावरून सीएसकेची देशभरात किती क्रेझ आहे याची कल्पना येते. या व्हिडिओवर चेन्नई सुपर किंग्जने प्रतिक्रिया दिली त्यांनी 'काय आपण सीएसके सीएसके ऐकतोय.' असे कॅप्शन दिले.

आयपीएलच्या 15 व्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जला फारशी चमक दाखवता आली नाही. त्यांना प्ले ऑफ गाठण्यात अपयश आहे. याचबरोबर त्यांच्यावर हंगाम अर्ध्यावर असताना आपला कर्णधार बदल्यांची नामुष्की देखील ओढवली. मात्र तरी देखील सीएसकेचे फॅन फॉलोइंग कमी झालेले नाही. त्यामुळे सामना जरी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होत असला तरी घोषणाबाजी मात्र सीएसकेचीच सुरू होती. दरम्यान, भारताने राजकोटमधील सामना 82 धावांनी जिंकत मालिकेत 2 - 2 अशी बरोबरी केली आहे. आता मालिकेचा निकाल रविवारी बंगळुरू येथे होणाऱ्या पाचव्या आणि शेवटच्या सामन्यात लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Premji Invest: आता 'ही' बँक होणार विप्रोच्या मालकीची? अझीम प्रेमजी 'या' बँकेतील 51 टक्के हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत

Canada Accident: कॅनडात भारतीय आजी-आजोबांसह तीन महिन्याच्या नातवाचा अपघातात मृत्यू; दुतावासही हळहळलं

Ind vs Sa Series : भारत-दक्षिण आफ्रिका खेळणार ODI-कसोटी अन् टी-20 मालिका, 'या' महिन्यात रंगणार थरार

Success Mantra: तुमच्या 'या' सवयींमुळे खराब होऊ शकते करिअर, आजच करा बंद

Latest Marathi News Live Update : ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी मुख्यमंत्र्यांनी कसली कंबर

SCROLL FOR NEXT