CWG 2022 Indias wrestling Birmingham Commonwealth Games begins today File Photo
क्रीडा

CWG 2022 : भारताच्या कुस्ती मोहिमेला आजपासून सुरुवात

भारतीय कुस्तीपटू सज्ज झाले आहेत. बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमधील कुस्ती या खेळाच्या मोहिमेला आजपासून सुरुवात होणार

सकाळ वृत्तसेवा

बर्मिंगहॅम : भारतीय कुस्तीपटू सज्ज झाले आहेत. बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमधील कुस्ती या खेळाच्या मोहिमेला आजपासून सुरुवात होणार आहे. पुरुष व महिला अशा दोन्ही गटांत मिळून भारताचे १२ खेळाडू यामध्ये सहभागी झाले आहेत. २०१८ मध्ये गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमधील कुस्ती या खेळामध्ये भारताचे १२ कुस्तीपटू सहभागी झाले होते. या बाराही खेळाडूंनी त्यावेळी पदक जिंकले होते. भारतीय खेळाडूंनी पाच सुवर्ण, तीन रौप्य व चार ब्राँझपदकांवर मोहोर उमटवली होती. यंदाही भारतीय कुस्तीपटूंनी तीच अपेक्षा बाळगली आहे.

कुस्तीमधील भारताची कामगिरी

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये सर्वाधिक पदक जिंकणाऱ्या देशांच्या यादीत ऑस्ट्रेलिया, इंग्लंड व कॅनडा या देशांनंतर भारताचा क्रमांक लागतो. बर्मिंगहॅम येथील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांआधी भारताने एकूण ५०३ पदके पटकावली होती. भारताने नेमबाजी या खेळामधून सर्वाधिक १३५ पदके जिंकली आहेत. त्यानंतर वेटलिफ्टिंग या खेळामधून १२५ पदकांवर मोहोर उमटवण्यात भारतीय खेळाडूंना यश लाभले आहे. कुस्ती या खेळामधून भारताने आतापर्यंत १०२ पदकांची माळ आपल्या गळ्यात घातली आहे. याचा अर्थ भारताने कुस्ती या खेळामधून पदकांची लयलूट केली आहे.

सहभागी होणारे कुस्तीपटू

पुरुष विभाग

रवी दहीया, बजरंग पुनिया, नवीन, दीपक पुनिया, दीपक, मोहित ग्रेवाल

महिला विभाग

पूजा गेहलोत, विनेश फोगाट, अंशू मलिक, साक्षी मलिक, दिव्या काकरन, पूजा सिहाग

हे कुस्तीपटू पदकासाठी प्रबळ दावेदार

पुरुष विभागात रवी दहीया, बजरंग पुनिया, दीपक पुनिया व महिला विभागात विनेश फोगाट, अंशू मलिक, दिव्या काकरन व साक्षी मलिक या कुस्तीपटूंकडे पदकासाठीचे प्रबळ दावेदार म्हणून बघितले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI व्यवहारांवर द्यावे लागणार शुल्क; नीती आयोगाच्या उपाध्यक्षांचे संकेत, कारणही सांगितलं...

Karmad News : उघड्या लिफ्टमधून बियाण्याची पोती नेताना तरुणाचा मृत्यू; कंपनी मॅनेजर, एचआर अधिकारी व कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा

Delhi Police IPS Transfers : दिल्ली पोलिस दलात मोठा फेरबदल; 5 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे नियुक्ती? पाहा बदल्यांची यादी

Bogus Doctor Crime : वारजे, खराडीत बोगस डॉक्टरांवर कारवाई; मनपाच्या बोगस वैद्यकीय व्यावसायिक शोध समितीची कारवाई

Latest Marathi News Live Update : मनमाड रेल्वे स्थानकात माथेफिरूचा धुमाकूळ; प्रवाशांवर दगडफेक, सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT