D Gukesh Chess sakal
क्रीडा

D Gukesh Chess : टोरांटोमध्ये भारतीय वादळ ; गॅरी कॅस्पारोव

भारताचा १७ वर्षीय डी. गुकेश याने रविवारी आव्हानवीरांच्या बुद्धिबळ स्पर्धेत अजिंक्यपदावर मोहर उमटवताना ऐतिहासिक कामगिरी केली. जागतिक स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या गुकेशवर चोहोबाजूंनी कौतुकाचा वर्षाव होऊ लागला.

प्रशांत पाटील

नवी दिल्ली : भारताचा १७ वर्षीय डी. गुकेश याने रविवारी आव्हानवीरांच्या बुद्धिबळ स्पर्धेत अजिंक्यपदावर मोहर उमटवताना ऐतिहासिक कामगिरी केली. जागतिक स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या गुकेशवर चोहोबाजूंनी कौतुकाचा वर्षाव होऊ लागला. याच पार्श्वभूमीवर रशियाचे महान बुद्धिबळपटू गॅरी कॅस्पारोव यांनीही गुकेशच्या पाठीवर कौतुकाची थाप मारताना म्हटले की, टोरांटोमध्ये भारतीय वादळ आले.

गॅरी कॅस्पारोव यांनी वयाच्या २२व्या वर्षी १९८४मध्ये आव्हानवीरांची बुद्धिबळ स्पर्धा जिंकत जगज्जेतेपदासाठीच्या लढतीत ॲनातली कारपोव यांच्याशी दोन हात केले. डी. गुकेश याने यंदाच्या आव्हानवीरांच्या बुद्धिबळ स्पर्धेत अजिंक्यपदाचा मान संपादन केला. तोही वयाच्या १७व्या वर्षी. त्याने कॅस्पारोव यांचा ४० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला. याप्रसंगी कॅस्पारोव यांनी सोशल मीडियावर गुकेशची स्तुति करताना म्हटले की, टोरांटोमध्ये डी. गुकेशच्या रूपात भारतीय वादळ आले. जागतिक बुद्धिबळाच्या पटावर नवी क्रांती घडून आली. आता जगज्जेतेपदाच्या लढतीत गुकेशसमोर चीनच्या डिंग लिरेन याचे आव्हान असेल. गुकेशचे अभिनंदन!

गॅरी कॅस्पारोव यांनी आपले मत व्यक्त करताना जागतिक बुद्धिबळातील रशियन खेळाडूंच्या वर्चस्वाला तडा गेल्याचे स्पष्टपणे सांगून टाकले. याचसोबत आता भारतीय खेळाडू बुद्धिबळ या खेळामध्ये पुढे येऊ लागले असून ते वर्चस्व गाजवत आहेत, याकडे कॅस्पारोव यांचा कल होता.

आनंद यांच्यामुळे युवा खेळाडू घडले

गॅरी कॅस्पारोव यांनी विश्‍वनाथन आनंद यांचेही मनभरून कौतुक केले. ते म्हणाले, विश्‍वनाथन आनंद यांनी भारतामध्ये बुद्धिबळ या खेळाला महत्त्व प्राप्त करून दिले. याच कारणामुळे भारतात आता बुद्धिबळातील स्टार खेळाडू घडू लागले आहेत. आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली भारतामध्ये बुद्धिबळपटूंचा विकास होत आहे.

बुद्धिबळाचा वेगाने प्रसार

काही वर्षांपूर्वीपर्यंत बुद्धिबळ या खेळामध्ये रशियन खेळाडूंचे एक हाती वर्चस्व असायचे; पण आता सर्व काही बदलले आहे. याबाबत गॅरी कॅस्पारोव म्हणाले, अमेरिका, इंग्लंड या देशांमध्येही अव्वल दर्जाच्या खेळाडूंची कमी नाही. भारत व चीनमध्ये एकापेक्षा एक असे युवा बुद्धिबळपटू जन्माला येत आहेत. बुद्धिबळ या खेळाचा वेगाने प्रसार व प्रचार होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रज्वल रेवन्नाचा आणखी एक कारनामा; तुरुंगात जप्त केलेल्या मोबाइलमध्ये सापडले १४५ हून अधिक अश्लील व्हिडीओ

IND vs WI: ऋतुराज गायकवाड, रिषभ पंत, जडेजाचे पुनरागमन होणार? वेस्ट इंडिजविरुद्धच्या ODI मालिकेसाठी का होणार संघात बदल

हरतालिकेची पूजा का करतात? एका क्लिकमध्ये वाचा व्रताचे महत्त्व!

'मी जे केलं ते तुम्ही करू नका...' सिंगल मदरहुडबद्दल नीना गुप्तांचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाल्या...

Marathi News Live Updates : गंगा नदीत बुडणाऱ्या १० बांगलादेशी नागरिकांची वाचवण्यात बीएसएफला यश

SCROLL FOR NEXT