Daniil Medvedev reached in Australian Open esakal
क्रीडा

Australian Open: मेदवेदेवने त्सित्सिपसचा कडावा प्रतिकार मोडून काढत गाठली फायनल

अनिरुद्ध संकपाळ

ऑस्ट्रेलियन ओपनच्या दुसऱ्या सेमी फायनलमध्ये डॅनिल मेदवेदेवने (Daniil Medvedev) स्टीफानोस त्सित्सिपसचा (Stefanos Tsitsipas) पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला. मेदवेदेवन स्टीफानोस त्सित्सिपसचा ७-६(७-५), ४-६, ६-४, ६-१ अशा सेटमध्ये पराभव केला. आता डॅनिल मेदवेदेव २० ग्रँडस्लॅम जिंकणाऱ्या राफेल नदालबरोबर (Rafael Nadal) ३० तारखेला ऑस्ट्रेलियन ओपनच्या टायलसाठी भिडणार आहे. (Daniil Medvedev reached in Australian Open defeat Stefanos Tsitsipas in semi final)

आजच्या सामन्यात मेदवेदेव (Daniil Medvedev) आणि स्टीफानोस यांनी पहिल्या सेटमध्ये झुंजार खेळ केला. पहिलाच सेट टाय ब्रेकरवर गेला. मात्र अखेरच्या क्षणी मेदवेदेवने आपला खेळ उंचावत पहिला सेट ७-६(७-५) असा जिंकला. मात्र त्यानंतर स्टीफानोसने जोरदार कमबॅक करत दुसरा सेट ४-६ असा आरामात जिंकला.

दोघांनीही एक एक सेट जिंकल्यानंतर तिसऱ्या सेटमध्ये मेदवेदेवने पुन्हा बाजी पलटवली. तिसऱ्या सेटमध्ये त्याने त्सित्सिपसला ६-४ असे नमवले. त्यानंतर चौथ्या सेटमध्ये मेदवेदेवन स्टीफानोसला (Stefanos Tsitsipas) पुनरागमनाची संधीच दिली नाही. त्याने चौथा सेट ६-१ अशा मोठ्या फरकाने जिंकत फायनलचे तिकिट निश्चित केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Property Tax : समाविष्ट गावाच्या मिळकतकराचा प्रश्‍न जैसे थे; पूर्वीच्याच आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश

Eknath Shinde: अस्वस्थ एकनाथ शिंदेंची अमित शाहांकडे नाराजी? थेट मुद्द्यालाच हात घातल्याची माहिती; इकडे फडणवीस-पवारांची गुप्त बैठक

Ayurvedic Kadha for Winter: थंडीमुळे सर्दी-खोकला आणि अंगही खाजतंय? 'हा' आयुर्वेदीक काढा आहे सुपर इफेक्टिव्ह!

Pune Cold : पुण्यात सलग तीन दिवस १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद

Fact Check: बिबट्या खरंच रणजी ट्रॉफी सामन्यावेळी धरमशाला स्टेडियममध्ये घुसला? जाणून घ्या Viral Video मागचं सत्य

SCROLL FOR NEXT