danish kaneria sakal exclusive interview comments about shahid afridi gautam gambhir controversy  sakal
क्रीडा

Sakal Exclusive : गौतम गंभीरबद्दलच्या वादावरून कनेरियाने शाहिद आफ्रिदीला खडे बोल सुनावले

गौतम गंभीर आणि शाहिद आफ्रिदीच्या वादावर दानिश कनेरियाच उत्तर...

Kiran Mahanavar

Danish Kaneria Sakal Exclusive Interview : सध्या आशिया चषक संपूर्ण जगात चर्चेचा विषय बनला आहे. या आशिया चषक एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असणारे भारत आणि पाकिस्तान हे संघ एका आठवड्याच्या छोट्या अंतरातच तब्बल दोन वेळा आमने-सामने आले. आशिया चषकातील पहिल्या सामना सुरू होण्यापूर्वी भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने पाकिस्तानी खेळाडूंची घेतलेली भेट सोशल मीडियावर व्हायरल झाली. मात्र या दोन्ही संघातील खेळाडू मध्ये झालेले वाद याआधी क्रिकेट इतिहास बरेच प्रसिद्ध झाले आहे. यातीलच एक प्रसंग म्हणजे भारताचा दिग्गज सलामीवीर गौतम गंभीर आणि पाकिस्तानचा दिग्गज अष्टपैलू शाहिद आफ्रिदी यांच्या 2007 साली झालेला वाद. या वादावर पाकिस्तानचा माजी दिग्गज गोलंदाज दानिश कनेरिया त्याने सकाळला दिलेल्या विशेष मुलाखतीत टिप्पणी केली.

सकाळच्या विशेष मुलाखती दानिश कनेरिया शाहिद आफ्रिदी आणि गौतम गंभीर यांच्या झालेल्या वादावर प्रश्न विचारला त्यावर तो म्हणाला की, शाहिद आफ्रिदी कधी काही बोलायचं ही कळत नाही. टीम इंडियामध्ये सर्वोत्तम खेळाडू होता गौतम गंभीर. त्यावेळीस टीम मध्ये सर्व खेळाडू त्याला पसंत करत होते, असं नसते तर गौतम गंभीर टीम मध्ये राहिला नसता. क्रिकेट खेळताना सर्व खेळाडू वेगवेगळ्या पद्धती तिने आपला गेम खेळतात. त्यावरून तो किती मेहनती करतो कळत. गौतम गंभीरवर शाहिद आफ्रिदीने जे विधान केले ते एकदम चुकीचे आहे. पाकिस्तान क्रिकेट संघात बघितलं तर तेथे कुठे आफ्रिदीला पसंत केल्या जाते. आधी आपल्या टीमचा पहा, मग दुसऱ्यांच्या टीमला पाहिला जा. असा खोचक टोला दानिश कनेरियाने शाहिद आफ्रिदीला लगावला.

काही दिवसांपूर्वी शाहिद आफ्रिदीचा एक व्हिडिओ व्हायरल होत होता. ज्यामध्ये आफ्रिदी LIVE टीव्ही शोमध्ये भारतीय संघाचा माजी खेळाडू गौतम गंभीरची खिल्ली उडवत होता. भारतातील एका टीव्ही चॅनलशी बोलताना आफ्रिदी म्हणाला होता की, मला भारतातील कोणत्याही खेळाडूशी भांडणे आवडत नाही. ट्विटरवर गौतम गंभीरसोबत अनेकदा वाद होत असतात. गौतम गंभीर हा असा माणूस आहे जो टीम इंडियाच्या कोणात्या खेळाडूला आवडत नाही. ज्या शोमध्ये शाहिद आफ्रिदीने हे वक्तव्य केले त्या शोमध्ये भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग देखील उपस्थित होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुणेकरांसाठी ‘जॅकपॉट’! IPL 2026 चा थरार गहुंजेत… युवा खेळाडूंच्या संघाचं होम ग्राऊंड! 2022 नंतर पहिल्यांदाच...

Zilla Parishad Election : अखेर ठरलं! जिल्हा परिषद निवडणूक होणार जाहीर, प्रशासकीय कामांना गती; सोमवारी घोषणा शक्य

Sangli Crime : तेच ठिकाण वेळही तीच, बदला घेतलाच! कॉलेजच्या दारातच तरुणावर चाकूने 14 सपासप वार; मांडी, डोके, हात, पोटावर घाव

Pune News:'पेरणे फाटा येथे ऐतिहासिक विजयस्तंभास वंदन'; लाखो आंबेडकरी अनुयायांचा उसळला जनसागर, रात्री उशिरापर्यंत अखंड रांगा!

Solapur Crime: साेलापुरात तृतीयपंथीचा खून, तिघांना पाच दिवसांची वाढीव कोठडी; तपासात धक्कादायक माहीती आली समाेर..

SCROLL FOR NEXT