क्रीडा

Pakistan Cricket: माझा बॅन उठवा! पाकिस्तानी खेळाडूची PM मोदींकडे आर्त हाक, बीसीसीआयचे धरले पाय

Kiran Mahanavar

Pakistan Cricket : पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू दानिश कनेरियाने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बीसीसीआयकडे मदत मागितली आहे. खरं तर विषय असा की, 2012 मध्ये ECB (इंग्लंड क्रिकेट बोर्ड) ने स्पॉट फिक्सिंग प्रकरणी क्रिकेटपटू दानिश कनेरियावर आजीवन बंदी घातली होती. दानिश कनेरियाने ही बंदी हटवण्यासाठी पंतप्रधान मोदी आणि बीसीसीआयकडे मदतीचे आवाहन केले आहे.

पाकिस्तानचा माजी क्रिकेटर दानिश कनेरिया गेल्या काही महिन्यांपासून आपल्या वक्तव्यांमुळे आणि ट्विटमुळे चर्चेत आहे. आज तकशी विशेष संवाद साधताना दानिश कनेरिया म्हणाले की, मी पंतप्रधान मोदी आणि BCCI यांना आवाहन करू इच्छितो की, ECB ने माझ्यावर लादलेली बंदी हटवण्यात मला मदत करावी.

यादरम्यान दानिशने पाकिस्तान क्रिकेट बोर्डवरही निशाणा साधला आणि म्हटले की, मी हिंदू नसतो तर पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार असतो. मी माझा धर्म खेळांपेक्षा वर ठेवला, त्यामुळे मी अनेक बाबतीत मागे पडलो. आणि हो पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लोकांच्या शिफारशींवर आधारित आहे. तेथे तुमची कामगिरी आणि कौशल्ये पाहिल्या जात नाही.

त्याने अजुन एक मोठा आरोप केला आणि सांगितले की, त्याच्यावर बोर्ड आणि त्याच्या सहकारी खेळाडूंनी इस्लाम स्वीकारण्यासाठी अनेक वेळा दबाव टाकला होता.

दानिश कनेरियाने या दरम्यान पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार इंझमाम उल हक आणि माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर यांचे कौतुक केले. तो म्हणाला की, जोपर्यंत इंझमाम उल हक संघात होता तोपर्यंत सर्व काही ठीक होते. आणि इतर सहकारी खेळाडूंप्रमाणे शोएब अख्तरने नेहमीच त्याला पाठिंबा दिला आणि म्हणाला की तु फक्त तुझ्या कामगिरीवर लक्ष केंद्रित कर.

दानिश कनेरिया असेही म्हणाले की, शक्य असल्यास भारतीय नागरिकत्व घेऊन भारतात येऊन वास्तव्य करू इच्छितो. त्यांनी पीएम मोदींचे कौतुक केले आणि तो म्हणाला की, पीएम मोदींच्या नेतृत्वाखाली भारताने प्रत्येक क्षेत्रात प्रचंड प्रगती केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe : कामातचं नाही सोशल मीडियावरही तुकाराम मुंढेंचा जलवा; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, विश्वास नांगरे- पाटलांना टाकलं मागे

Nipani Tavandi Ghat Case : राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटाजवळ दगडाने ठेचून गडहिंग्लज साखर कारखान्यातील कर्मचाऱ्याचा खून; महमदवर धारदार शस्रानेही हल्ला

China Nepal Border: मृत्यूचे तांडव डोळ्यांसमोर पाहतोय! प्रत्यक्षदर्शीचा अनुभव; चीन-नेपाळ सीमेवर अडकले राज्यातील ४०० भाविक

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

SCROLL FOR NEXT