daren sammy 
क्रीडा

Independence Day 2022 : डॅरेन सॅमीच्या स्वातंत्र्य दिन शुभेच्छांवर नेटकरी चांगलेच भडकले

सॅमीने ज्या पद्धतीने भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या त्यावर नेटकऱ्यांनी आक्षेप

Kiran Mahanavar

Daren Sammy : वेस्ट इंडीजचा माजी कर्णधार डॅलेन सॅमीने भारताच्या अमृत मोहत्सवी स्वांतत्र्य दिनानिमित्त ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या. सॅमीने यापूर्वी पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिनाला देखील शुभेच्छा दिल्या होत्या. मात्र सॅमीने ज्या पद्धतीने भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या त्यावर नेटकऱ्यांनी आक्षेप घेतला.

भारताच्या स्वातंत्र्यांची 75 वर्षे पूर्ण झाली आहे. या निमित्ताने देशातूनच नाही तर विदेशातील लोकांनीही शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अशाच प्रकारे वेस्ट इंडीजचा माजी कर्णधार डॅरेल सॅमीने देखील भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली की, 'स्वांतत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा भारत, याच ठिकाणी मी माझा शेवटचा आंततराष्ट्रीय सामना खेळला होता.' यावेळी त्याने हातात दोन ट्रॉफी घेतलेला फोटो शेअर केला.

मात्र या पोस्टवर भारतातील नेटकरी चांगलेच भडकले. त्यांना सॅमीने दिलेल्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा आवडल्या नाहीत. डॅरेन सॅमी भारतात चांगला लोकप्रीय आहे. त्याच्या नेतृत्वात वेस्ट इंडीजने टी 20 वर्ल्डकप देखील जिंकला होता. तो भारतात अनेक फ्रेंचायजींकडून आयपीएल देखील खेळला आहे. मात्र त्याचे पाकिस्तान प्रेम भारतातील नेटकऱ्यांनी रूचले नाही.

सॅमीने भारताला स्वांतत्र्य दिनाच्या शुभेच्छा देण्यापूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये तो पाकिस्तानच्या झेंड्यासोबत दिसतो आहे. त्याने पाकिस्तानला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. पाकिस्तानला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देण्यात गैर काहीच नव्हते. मात्र ज्यावेळी त्याने भारताला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या त्यावेळी त्याने हातात तिरंगा घेतला नाही. सॅमीला एका यूजरने विचारले की, तुम्ही पाकिस्तानचा झेंडा हातात घेतला आहे. भारतीय तिरंग्याचे काय? पाकिस्तानी लोकांना का खुश करायचे? दुसर्‍या यूजरने लिहिले, हे अन्यायकारक आहे भाऊ, आमच्यासोबत, आम्हाला तुमच्यासाठी पाकिस्तान आणि भारतासाठी काहीतरी वाईट वाटते.

सॅमीला पाकिस्तानातील नागरिकत्वाचा सर्वोच्च सन्मानही मिळाला आहे. त्यांना पाकिस्तानमध्ये 'सितारा-ए-पाकिस्तान' या सन्मानाने सन्मानित करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TikTok India News: भारतात पुन्हा 'टिकटॉक' सुरू होणार? ; वेबसाइट सुरू झाल्याचे समोर आल्याने चर्चांना उधाण!

Ajit Pawar: 'चाकरमानी’ नव्हे; ‘कोकणवासीय’ म्हणायचे! अजित पवारांची जागवला स्वाभिमान; शासन लवकरच परिपत्रक काढणार

Manoj Jarange Patil: मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ उपसमितीचं पुनर्गठन; राधाकृष्ण विखेंकडे अध्यक्षपद

Georai News : पाझर तलावात उतरल्याने बुडून शेतमजूराचा मृत्यू; दिवसभर शोध घेऊनही मृतदेह मिळाला नाही

Mumbai Local Megablock: रविवारी रेल्वे प्रवाशांना फटका बसणार, मध्य, हार्बर आणि पश्चिम मार्गावर ब्लॉक; वेळापत्रकात बदल

SCROLL FOR NEXT