Dattajirao Gaekwad latest marathi news sakal
क्रीडा

Dattajirao Gaekwad Dies : क्रिकेट विश्वात पसरली शोककळा! टीम इंडियाच्या माजी कर्णधाराने घेतला जगाचा अखेरचा निरोप

Dattajirao Gaekwad Dies News : भारतीय क्रिकेट विश्वात शोककळा पसरली आहे.

Kiran Mahanavar

Dattajirao Gaekwad Dies News : भारतीय क्रिकेट विश्वात शोककळा पसरली आहे. भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दत्ताजीराव गायकवाड यांनी मंगळवारी बडोदा येथील राहत्या घरी वयाच्या 95 वर्षी अखेरचा श्वास घेतला.

दत्ताजीराव गायकवाड यांनी 1952 मध्ये इंग्लंड दौऱ्यावर कसोटी पदार्पण केले आणि त्यानंतर भारतासाठी 10 कसोटी सामने खेळले. त्याने शेवटची कसोटी 1961 मध्ये पाकिस्तानविरुद्ध चेन्नई येथे खेळली होती.

1959 मध्ये इंग्लंड दौऱ्यावर दत्ताजीराव कर्णधार म्हणून गेले होते. त्या इंग्लंड दौऱ्यात त्यांनी 1100 हून अधिक धावा केल्या होत्या. पण, कसोटी मालिकेत इंग्लंडने भारताचा 5-0 असा पराभव केला.

या दौऱ्यानंतर त्यांनी दीर्घकाळ देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपली क्षमता सिद्ध केली आणि 1957-58 हंगामात त्यांनी बडोद्याला दशकात प्रथमच रणजी करंडक जिंकून दिले. गायकवाड यांनी फायनलमध्ये सर्व्हिसेसविरुद्ध डावात विजय मिळवत शतक (132) केले. त्याने 110 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 17 शतकांच्या मदतीने 5788 धावा केल्या. नाबाद 249 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या होती.

दत्ताजीराव गायकवाड भारताचे सर्वाधिक काळ कसोटी क्रिकेटपटू होते, ते भारताचे माजी क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड यांचे वडील आहेत. जे दोन वेगवेगळ्या कार्यकाळात टीम इंडियाचे प्रशिक्षक होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: अजित पवारांनी विजय वडेट्टीवारांची घेतील सांत्वनपर भेट

तारापूर एमआयडीसीत वायू गळती; चार कामगारांचा मृत्यू; दोघांची प्रकृती चिंताजनक

SCROLL FOR NEXT