David Miller esakal
क्रीडा

David Miller : झुंजार शतक करत मिलरने रचला इतिहास; अशी कामगिरी करणारा दक्षिण अफ्रिकेचा पहिला खेळाडू

अनिरुद्ध संकपाळ

David Miller World Cup Record : दक्षिण अफ्रिकेचा मधल्या फळीतील फलंदाज डेव्हिड मिलरने आज अडचणीत सापडलेल्या संघासाठी धावून आला. दक्षिण अफ्रिकेची अवस्था 4 बाद 24 धावा अशी झाली असताना त्याने 101 धावांची शतकी खेळी करत संघाला 212 धावांपर्यंत पोहचवले. त्याला क्लासेनच्या 47 धावांची साथ लाभली.

डेव्हिड मिलरने या आपल्या झुंजार शतकी खेळीच्या जोरावर संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहचवले. याचबरोबर त्याने एक मोठा विक्रम देखील आपल्या नावावर केला. वर्ल्डकपच्या 48 वर्षांच्या इतिहासात जे घडलं नव्हतं ते किलर मिलरने करून दाखवलंय.

डेव्हिड मिलर हा दक्षिण अफ्रिकेकडून वनडे वर्ल्डकपच्या बाद फेरीत शतक ठोकणारा पहिलाच फलंदाज ठरला आहे.

44 वर्षापूर्वीचा रेकॉर्ड मोडला

वनडे वर्ल्डकपमध्ये सहाव्या किंवा त्यापेक्षाही खालच्या क्रमांकावर फलंदाजीला येत बाद फेरीत सर्वात मोठी खेळी करणाऱ्यांच्या यादीत डेव्हिड मिलर आता अव्वल स्थानावर पोहचला आहे.

यापूर्वी हे रेकॉर्ड वेस्ट इंडिजचे माजी फलंदाज कोलिस किंगच्या नावावर होदे. त्यांनी 1979 च्या वर्ल्डकपमध्ये इंग्लंडविरूद्ध 86 धावांची खेळी केली होती. या यादीत आता तिसऱ्या स्थानावर रविंद्र जडेजा आहे. त्याने 2019 च्या वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंडविरूद्ध 77 धावांची खेळी केली होती.

दरम्यान, डेव्हिड मिलरच्या झुंजार खेळीनंतरही दक्षिण अफ्रिका पराभवाच्या छायेत राहिली. त्यांंचा डाव 212 धावात संपुष्टात आला. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने दमदार सुरूवात करत 6 षटकात 60 धावा चोपल्या.

यानंतर अफ्रिकेने प्रतिकार करत डेव्हिड वॉर्नरला 29 तर मार्शला शुन्यावर बाद केले. मात्र त्यानंतर हेड आणि स्मिथने 14 व्या षटकात ऑस्ट्रेलियाचे शतक धावफलकावर लावले. मात्र मारक्ररमने हेडला 62 धावांवर बाद करत तिसरा धक्का दिला.

मात्र या धक्क्यातून सावरत स्मिथ आणि मार्नस लाबुशेनने भागीदारी रचण्याचा प्रयत्न केला. त्यांनी ऑस्ट्रेलियाला 22 व्या षटकात 133 धावांवर पोहचवले असतानाच तबरेज शम्सीने लाबशेनला 18 धावांवर बाद करत सामन्यात रंगत निर्माण केली.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithvi Shaw: ठरलं! मुंबई सोडलेल्या पृथ्वी शॉला मिळाला नवा संघ, आता ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार

Latest Maharashtra News Updates : एरंडोल तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी समाधानकारक पाऊस

Video: धक्कादायक! रिलसाठी अल्पवयीन मुलाने ट्रेन ट्रॅकवर जीव धोक्यात टाकला, व्हायरल व्हिडिओ

सुलतानला नऊ वर्षं पूर्ण ! सलमानने सिनेमासाठी स्वतःमध्ये घडवलेले हे पाच बदल

Tahawwur Rana : 26/11 दहशतवादी हल्ला प्रकरणी महत्त्वाची अपडेट; तहव्वूर राणानं दिली हल्ल्याची कबुली, नेमकं काय केला खुलासा?

SCROLL FOR NEXT