David Warner Robbery latest News Sakal
क्रीडा

David Warner News : शेवटच्या कसोटी सामन्याआधी डेव्हिड वॉर्नर टेन्शनमध्ये! मौल्यवान वस्तूंची बॅग गेली चोरीला

David Warner latest News Marathi | कडेकोट सुरक्षेमध्ये वॉर्नरची बॅग गेली चोरीला! व्हिडिओ पोस्ट करत दिली मोठी 'ऑफर'

Kiran Mahanavar

David Warner latest News : ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर सिडनीमध्ये शेवटचा कसोटी सामना खेळणार आहे. मात्र याआधी वॉर्नरची बॅग चोरीला गेली आहे. यानंतर वॉर्नरने आपल्या सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला. आणि ज्या व्यक्तीने ती चोरली त्याला त्याची टोपी परत करण्याचे आवाहन केले. आणि एक खास ऑफरही दिली की, ती परत करणाऱ्या व्यक्तीला तो काही करणार नाही आणि त्याला अशीच बॅग देईल.

डेव्हिड वॉर्नर सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. आणि अनेकदा त्याच्या मजेदार व्हिडिओंद्वारे चाहत्यांचे मनोरंजन करतो. पण, आज त्याने हा व्हिडिओ कोणत्याही मौजमजेसाठी नाही तर चोरीला गेलेला मौल्यवान वस्तू परत मिळवण्यासाठी शेअर केला आहे.

हा व्हिडिओ शेअर करताना वॉर्नरने लिहिले की, "दुर्दैवाने, हा माझा शेवटचा पर्याय आहे. कोणीतरी सामानातून माझी बॅग काढली आहे, ज्यामध्ये माझी टोपी आणि माझ्या मुलांसाठी भेटवस्तू होत्या. हे माझ्यासाठी भावनिक आहे, मला या वस्तू परत मिळाव्यात अशी माझी इच्छा आहे.

वॉर्नरने पुढे लिहिले की, जर तुम्हाला खरोखर बॅक हवे असलेले असेल तर, माझ्याकडे अजून एक आहे. माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही ती परत केलीत तर मी तुम्हाला काही करणार नाही. आणि तुम्ही टोपी परत केली तर मी ही बॅग तुम्हाला देण्यात आनंद देईल. त्या बॅकमध्ये दोन बॅगी ग्रीन कॅप्स आहेत, मला ही बॅग मिळल यांची आशा आहे.

ऑस्ट्रेलियन फलंदाज डेव्हिड वॉर्नरने सिडनी कसोटीपूर्वी सर्वांना आश्चर्यचकित करत वनडे क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. होय, आधीच कसोटीतून निवृत्ती जाहीर करणारा वॉर्नर सिडनीत शेवटची कसोटी खेळणार आहे. पण आता तो एकदिवसीय क्रिकेटमध्येही दिसणार नाही, हा चाहत्यांसाठी दुहेरी धक्काच आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT