David Warner Banter With Fan  esakal
क्रीडा

David Warner VIDEO : डेव्हिड वॉर्नरने लाईव्ह सामन्यादरम्यान शर्ट मागणाऱ्या चाहत्याला दिले भन्नाट उत्तर

अनिरुद्ध संकपाळ

David Warner Banter With Fan : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन वनडे सामन्यांची मालिका आजपासून अॅडलेडवर सुरू झाली आहे. आज पहिल्या सामन्यात डेव्हिड वॉर्नरने 86 धावांची खेळी करत ऑस्ट्रेलियाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. दरम्यान, डेव्हिड वॉर्नर आणि त्याचा छोटा फॅन यांच्यात लाईव्ह सामन्यादरम्यान चिठ्ठ्यांची देवाणघेवाणही रंगली. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यात डेव्हिड वॉर्नर ड्रेसिंग रूममध्ये बसला असताना एका छोट्या चाहत्याने प्रेक्षक गॅलरीतून एक चिठ्ठी सर्वांना दाखवली. या चिठ्ठीद्वारे या छोट्या चाहत्याने डेव्हिड वॉर्नर तू मला तुझा शर्ट देऊ शकतो का? असे विचारले. यानंतर कॅमेरामनने कॅमेरा डगआऊटमध्ये बसलेल्या डेव्हिड वॉर्नरकडे वळवला. डेव्हिड वॉर्नर मुलाची चिठ्ठी पाहून हसतो. त्यावेळी शेजारी बसलेले खेळाडू त्याची चेष्टा करू लागतात आणि त्याचा शर्ट काढण्याचा प्रयत्न करतात.

डेव्हिड वॉर्नर आपल्या शेजारी खेळाडूंना सांगतो की मी आतमध्ये काही घातलेलं नाही. यानंतर वॉर्नर देखील कॅमेरामनला एक चिठ्ठी दाखवतो. या चिठ्ठीवर 'मार्नस लॅम्बुशग्नेचा शर्ट घे' असे लिहिले होते. याला प्रत्युत्तर म्हणून तो छोटा मुलगा दुसरी चिठ्ठी दाखवतो त्यात, 'मार्नस कृपया मला तुझा शर्ट मिळू शकतो का?' असे लिहिलेले होते. यानंतर पॅव्हेलियनमध्ये बसलेले डेव्हिड वॉर्नर आणि मार्नस हे जोरजोरात हसू लागतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : कर्नाटक-तामिळनाडूमधील कावेरी वादावर सुप्रीम कोर्टात सोमवारी सुनावणी

Alien Star Reels Viral: इंस्टावर व्हायरल झालेला ‘एलियन स्टार’ कोण? आधी लोकांनी उडवली थट्टा, आता प्रत्येक व्हिडिओला मिलियन व्ह्यूज

Dangerous River Stunts: पावसाळ्यात अशी चूक करू नका! खवळलेल्या नदीत ३ तरुणांची जीवघेणी स्टंटबाजी; पोलिसांचा VIDEO VIRAL

मुलांनो! राजकारणात पडू नका; भ्रष्टाचाराच्या आरोपांनी व्यथित माजी मंत्र्याची 'शेवटची चिट्ठी', कार्यालयात आढळला मृतदेह

Congress Leader Murder : काँग्रेस नेत्याची मुलासह निर्घृणपणे हत्या ! कारला घेरलं, गोळ्या झाडल्या अन् धारदार शस्त्रांनी बाप-लेकाला संपवलं

SCROLL FOR NEXT