David Warner Century In 100th Test esakal
क्रीडा

David Warner : राजकारण करणाऱ्या CA ला वॉर्नरचे 100 व्या कसोटीत चोख प्रत्युत्तर; ठरला इतिहासातील दुसराच खेळाडू

अनिरुद्ध संकपाळ

David Warner Century In 100th Test : डेव्हिड वॉर्नरच्या बॅटमधून गेल्या 1086 दिवसांपासून कसोटीत शतक आले नव्हते. वॉर्नर संपला असे वाटत होते. याचबरोबर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने कर्णधारपदावरील त्याच्या बॅनबाबत दुटप्पी भूमिका घेत त्याचे खच्चीकरण केले. मात्र झुंजार वॉर्नरने या सर्वाना एका खास कसोटीत चोख प्रत्युत्तर दिले. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरी कसोटी बॉक्सिंग डेला सुरू झाली. ही खास डे नाईट कसोटी डेव्हिड वॉर्नरची 100 वी कसोटी होती. त्यात डेव्हिड वॉर्नरने शतकी खेळी करत मोठा धमाका केला.

डेव्हिड वॉर्नर आपल्या शंभराव्या कसोटीत शतकी खेळी करणारा 10 वा आंतरराष्ट्रीय खेळाडू ठरला. याचबरोबर डेव्हिड वॉर्नरने आपल्या 100 व्या वनडे सामन्यात देखील शतकी खेळी केली होती. त्यामुळे क्रिकेट इतिहासात आपल्या 100 व्या वनडे आणि 100 व्या कसोटी सामन्यात शतक ठोकणारा डेव्हिड वॉर्नर हा जगातील फक्त दुसरा खेळाडू ठरला. यापूर्वी वेस्ट इंडीजच्या गॉर्डन ग्रीनेज यांनीच हा कारनामा केला होता. आता त्यांच्या सोबत डेव्हिड वॉर्नरचे नाव देखील या यादीत समाविष्ट झाले आहे. (Sports Latest News)

डेव्हिड वॉर्नरने 6 जानेवारी 2020 मध्ये आपले शेवटचे शतक झळकावले होते. त्यानंतर कोरोनाची वैश्विक महामारी सुरू झाली होती. त्यामुळे डेव्हिड वॉर्नरच्या बॅटमधून कसोटी शतक येण्याला 1086 दिवस लागले. अखेर त्याने बॉक्सिंग डेला हा दुष्काळ संपवला. या शतकामुळे संपूर्ण वॉर्नर परिवार आनंदाने नाचू लागले होते. वॉर्नरची पत्नी कँडिस आपल्या मुलींसह वॉर्नरने आपले सिग्नेचर सेलिब्रेशन केल्यावर आनंदाने उड्या मारत होते.

हेही वाचा : जोखीममुक्त व्यवहारांसाठी रिझर्व बँकेचा 'डिजिटल रुपया'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! ग्रामपंचायतींचा नोव्हेंबरअखेर वाजणार बिगुल? सरपंच आरक्षण जाहीर, आता सदस्यांची आरक्षण सोडत १२ जूनला; मतदार यादी ‘या’ महिन्यात होणार अंतिम

येत्या जून महिन्यात बनतोय अत्यंत खतरनाक खप्पर योग ! रातोरात बदलणार नशीब; कुणाला शुभ तर कुणाला अशुभ घ्या जाणून

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

SCROLL FOR NEXT