क्रीडा

डेव्हिड 'अलू अर्जून' वॉर्नर... हा भन्नाट Video पाहिलात?

विराज भागवत

वॉर्नरच्या या इन्स्टाग्राम व्हिडीओला खूपच पसंती मिळताना दिसत्येय...

सिडनी: ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नर हा कायमच आपल्या नवनव्या व्हिडीओमुळे चर्चेत असतो. त्याच्या वेगवेगळ्या इन्स्टाग्राम व्हिडीओला खूपच प्रतिसाद मिळताना दिसतो. सुरूवातीला वॉर्नर टीकटॉकवर खूपच अॅक्टिव्ह होता. पण भारतात टीकटॉकवर बंदी घातल्यानंतर त्याने इन्स्टाग्रामवर आपल्या व्हिडीओ पोस्ट करण्यास सुरूवात केली. सुरूवातीला बॉलिवूडच्या गाण्यांवरील प्रेम दाखवल्यानंतर मग त्याने आपला मोर्चा साऊथ इंडियन चित्रपटांतील गाण्यांकडे वळवला. सध्या साऊथचा हिरो अलू अर्जून याच्या गाण्याच्या व्हिडीओमुळे वॉर्नर चर्चेत आहे.

डेव्हिड वॉर्नरने एक व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलाय. अलू अर्जूनच्या इतर काही गाण्यांवर वॉर्नरने अनेकदा स्वत: डान्स केल्याचं दिसलं होतं. पण आता मात्र त्याने थेट अलू अर्जूनच्या चेहऱ्यावर स्वत:चा चेहरा लावून एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. अलू अर्जूनच्या अलावैकुंठपुरमलू या चित्रपटातील एका लोकप्रिय गाण्याचा व्हिडीओ त्याने पोस्ट केला आहे. रमुलो रमुला या गाण्यात अलू अर्जूनने अप्रतिम डान्स केला आहे. त्या व्हिडीओतील छोटासा तुकडा कट करून त्यात त्याने अलू अर्जूनच्या जागी स्वत:चा चेहरा लावला आहे. या व्हिडीओ तुफान पसंती मिळताना दिसतेय.

दरम्यान, वॉर्नर हैदराबाद संघाकडून IPL 2021 खेळत होता. पण हैदराबाद संघ आणि वॉर्नर दोघांची कामगिरी अपेक्षित होत नसल्याने हैदराबादचा कर्णधार बदलण्यात आला. केन विल्यमसनकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले. पण एका सामन्यानंतर लगेच कोरोनाच्या तडाख्यामुळे IPL चे आयोजन अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI Awards: विश्वविजेत्यांचा सन्मान, द्रविड-मिताली राजला जीवनगौरव, तर गिल-मानधना सर्वोत्तम क्रिकेटर; पाहा विजेत्यांनी संपूर्ण यादी

Pune News: व्यावसायिक गॅस सिलेंडर बंद, आंबेगाव तालुक्यात हॉटेल व्यवसायिकांमध्ये असंतोष; आठ हजार कामगारांवर बेरोजगारीचे संकट..

IASने प्रोजेक्टला मंजुरीसाठी ५ टक्के लाच मागितल्याचा आरोप, निलंबनानंतर वर्षभराने पुन्हा सेवेत; सोपवली महत्त्वाची जबाबदारी

Baramati Assembly Election : बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार का..? पारंपरिक विरोधकांच्या भूमिकेकडे लक्ष...

Latest Marathi Live Update : कांदळवन वाचवण्यासाठी मुंबईच्या अंधेरी पश्चिम वर्सोवा परिसरात नागरिकांचे मोठे आंदोलन

SCROLL FOR NEXT