David Warner  esakal
क्रीडा

David Warner : हा ऑस्ट्रेलियन 'पुष्पा' पाकला पाहून खवळतो! 14 चौकार 9 षटकार, 23 चेंडूत 110 धावा

अनिरुद्ध संकपाळ

David Warner : भारताकडून दारूण पराभव झाल्यानंतर पाकिस्तान आज आपला वर्ल्डकपमधील चौथा सामना खेळत आहे. मात्र भारताविरूद्धच्या पराभवाचे सावट काही त्यांचा पिच्छा सोडत नाहीये.

ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या आजच्या सामन्यात पाकिस्तानच्या गोलंदाजांनी कांगारूंकडून सपाटून मार खालला. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श यांनी शतकी धमाका करत 33 षटकातच 259 धावांची झंजावाती सलामी दिली. बर्थडे बॉय मार्श 121 धावा करून बाद झाला.

मात्र डेव्हिड वॉर्नरने शतकानंतरही पाकिस्तानचा पिच्छा सोडला नाही. त्याने 124 चेंडूत 163 धावा ठोकल्या. विशेष म्हणजे शतकी खेळीनंतर पुष्पा स्टाईलमध्ये सेलिब्रेशन करत वॉर्नर बहुदा झुकेगा नहीं साला असंच म्हणत असेल.

डेव्हिड वॉर्नर हा पाकिस्तानविरूद्ध कायम धावा करतो. डेव्हिड वॉर्नरने पाकिस्तानविरूद्धच्या गेल्या चार वनडे इनिंगमध्ये चार शतके ठोकली आहे. त्याने 119 चेंडूत 130, 128 चेंडूत 179, 111 चेंडूत 107 धावा ठोकल्या होत्या. आज वर्ल्डकपच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 124 चेंडूत 163 धावांची दीडशतकी खेळी केली.

डेव्हिड वॉर्नरने आपल्या 163 धावांच्या खेळीत तब्बल 14 चौकार आणि 9 षटकार मारले. म्हणजे त्याने 163 धावांमधील 110 धावा या फक्त 23 चेंडूत ठोकल्या आहेत. डेव्हिड वॉर्नरची ही वर्ल्डकपमधील सर्वोच्च धावसंख्या आहे.

याचबरोबर वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिकवेळा 150 धावा करणाऱ्यांच्या यादीत वॉर्नर अव्वल स्थानावर असलेल्या रोहित शर्माच्या जवळ पोहचला आहे. रोहित शर्माने वनडे क्रिकेटमध्ये 8 वेळा दीडशतकी खेळी केली आहे. तर वॉर्नरने 7 वेळा दीडशतकी खेळी केली आहे.

मात्र वॉर्नर (163) मार्श (121) यांच्या शतकी धमाक्यानंतर स्टॉयनिस (21) आणि जॉश इंग्लिस (13) यांच्याव्यतिरिक्त कोणालाही दुहेरी आकडा गाठता आला नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलिया आज 400 प्लसची धावसंख्या उभारणार असे वाटत असतानाच त्यांचा डाव 50 षटकात 9 बाद 367 धावांवर संपला. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदीने 5 तर राऊफने 3 विकेट्स घेतल्या.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Middle Class: 5 मिनिटांत बँक बॅलन्स 43,000 रुपयांवरून 7 रुपयांवर आला; भाड्यापासून ते EMIपर्यंत.. मध्यमवर्ग आर्थिक संकटात

Latest Maharashtra News Updates : एरंडोल तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी समाधानकारक पाऊस

Supreme Court: सरकारी बंगला रिकामा करून ताब्यात घ्या; माजी सरन्यायाधीशांच्या निवासस्थानाबाबत न्यायालयाचे पत्र

Prithvi Shaw: ठरलं! मुंबई सोडलेल्या पृथ्वी शॉला मिळाला नवा संघ, आता ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार

Video: धक्कादायक! रिलसाठी अल्पवयीन मुलाने ट्रेन ट्रॅकवर जीव धोक्यात टाकला, व्हायरल व्हिडिओ

SCROLL FOR NEXT