David Warner Video Goes Viral Sakal
क्रीडा

Video : वॉर्नरचे 'पुष्पा' गाण्यावर ठुमके अन् कोहलीची रिअ‍ॅक्शन

हा व्हिडिओ तुफान व्हायरल होताना दिसतोय.

सुशांत जाधव

ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेविड वॉर्नर (David Warner) सोशल मीडियावर चांगलाच सक्रीय असतो. कांगारुंचा ताफा अ‍ॅशेस कसोटी मालिकेतील पहिल्या विजयाच्या सेलिब्रेशन मूडमध्ये असताना वॉर्नरने सोशल मीडियाच्या माध्यमातून एक खास व्हिडिओ शेअर केलाय. हा व्हिडिओ तुफान व्हायरल होताना दिसतोय.

डेविड वार्नरने अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा- द राइज’ चित्रपटातील गाण्यावर ठुमके लगावले आहेत. वॉर्नरने फेस स्वॅपचा वापर करुन केलेली कलाकृती चांगलीच व्हायरल होत आहे. भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली त्याचा हा नवा अवतार पाहून हैराण झालाय. तो बरा तर आहेस ना!, अशा आशयाची प्रतिक्रिया कोहलीने वॉर्नरने शेअर केलेल्या व्हिडिओवर दिलीये.

डेविड वॉर्नर अ‍ॅशेस मालिकेत (Ashes Series) व्यस्त असला तरी मोकळ्या वेळेत तो सोशल मीडियावर आपली सक्रीयता कायम ठेवताना दिसते. अ‍ॅशेस कसोटी मालिकेतील पहिला सामना ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर रंगला होता. हा सामना जिंकून पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात वॉर्नरने 94 धावांची धमाकेदार खेळी केली होती.

ऑस्ट्रेलिया संघाच्या विजयानंतर आनंद व्यक्त करण्यासाठी वॉर्नरने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओमध्ये तो ‘आई बिड्डा इधि ना अड्डा’ या गाण्यावर नाचताना दिसते. या निमित्ताने ऑस्ट्रेलियन क्रिकेटरचे टॉलीवूड प्रेम पुन्हा एकदा दिसून आले आहे. वॉर्नरचा हा व्हिडिओ 16 लाखांहून अधिक जणांनी पाहिला आहे. विराट कोहली (Virat Kohli) ने या व्हिडिओवर कमेंट दिली आहे. विराटने लिहलंय की, ‘यार तुम ठीक तो हो?’ सार्वजनिक रित्या कोहलीने वॉर्नरची फिरकी घेण्याचा प्रयत्नच यातून केल्याचे दिसते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ईडीने जप्त केलेली 3,464 कोटींची मालमत्ता विक्री करण्यास कोर्टाची मंजुरी; गुंतवणूकदारांचे 1,950 कोटी माघारी मिळणार

Akola Crime : कार लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश! ‘एलसीबी’कडून सहा तासांत तीन आरोपी अटकेत, १८.७० लाखांचा मुद्देमाल जप्त

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर कारखान्याच्या विजयी उमेदवारांनी अजितदादांना वाहिली आदरांजली

Cordelia Sky : १,५०० ड्रोनच्या रोषणाईने मुंबईचे आकाश उजळले! ‘कॉर्डेलिया स्काय’चे आगमन

INS Mangrol : मुंबईच्या सागरी सुरक्षेला स्वदेशी ‘आयएनएस मंगरोल’चे बळ!

SCROLL FOR NEXT