David Warner
David Warner esakal
क्रीडा

वॉर्नरला अ‍ॅशेस राखल्यानंतर आता भारतात करायचीये 'ही' कामगिरी

अनिरुद्ध संकपाळ

मेलबर्न : ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या कसोटीत इंग्लंडचा एक डाव आणि १४ धावांनी मोठा पराभव करत अ‍ॅशेस मालिकेत (Ashes Series) ३ - ० अशी विजयी आघाडी घेतली. यंदाच्या अ‍ॅशेस मालिकेतील ऑस्ट्रेलियाच्या यशात सलामीवीर डेव्हिड वॉर्नरची (David Warner) मोलाची भुमिका होती. डेव्हिड वॉर्नरने मालिका विजय निश्चित झाल्यावर प्रतिक्रिया दिली. या प्रतिक्रियेत त्याने भारताचा (India) खास उल्लेख करत एक इच्छा व्यक्त केली. याचबरोबर त्याने इंग्लंडमध्ये अ‍ॅशेस जिंकण्याचाही मनसुबा बोलून दाखवला.

इएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना डेव्हिड वॉर्नर (David Warner) म्हणाला, 'आम्ही अजून भारताला भारतात पराभूत केलेले नाही. ही कामगिरी करायला नक्की आवडेल. याचबरोबर इंग्लंडमध्ये आम्ही २०१९ ला अ‍ॅशेस मालिका (Ashes Series) बरोबरीत सोडवली होती. जर मला संधी मिळाली तर मी इंग्लंडमध्ये पुन्हा जाण्याचा विचार नक्की करेन.' डेव्हिड वॉर्नर २०१९ च्या अ‍ॅशेस मालिकेत अपयशी ठरला होता. स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad) त्याला सातत्याने पॅव्हेलियनचा रस्ता दाखवत होता.

डेव्हिड वॉर्नर या मुलाखतीत म्हणाला की, वयाचा कोणताच अडथळा नाही. याबाबतीत त्याने इंग्लंडच्या जेम्स अँडरसनचे (James Anderson) उधार दिले. तो म्हणाला की त्याने कसोटी क्रिकेटमध्ये एक बेंचमार्क सेट केला आहे.

वॉर्नर जेम्स अँडरसनबद्दल म्हणाला की, 'मला असे वाटते की जेम्स अँडरसनने वयस्कर खेळाडूंसाठी एक बेंचमार्क सेट केला आहे. आम्ही त्याच्याकडेच पाहतो. मात्र माझ्यासाठी माझ्या क्षमतेनुसार खेळणे आणि स्कोअरबोर्डवर धावा करणे महत्वाचे असते. पहिल्या दोन कसोटीत मी एका चपखल फलंदाजासारखा दिसत होतो. मी माझ्या कारकिर्दित वेगळ्यात प्रकारे खेळत होतो. गंभीर होऊन खेळणे, गोलंदाजाला ते ज्या लाईन आणि लेंथवर गोलंदाजी करत होते त्याला आदर देणे. हे खरं आहे की मी शतकापासून (David Warner Century) वंचित राहिलो.'

तो पुढे म्हणाला की, 'मी चांगल्या लयीत होतो. मी यापूर्वी सांगितल्या प्रमाणे माझ्याकडून धावा होत नव्हत्या मात्र मी फॉर्ममध्येच नव्हतो असे नव्हते. मला आशा आहे की मी नव्या वर्षात अजून धावा करु शकेन.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT