David Warner Daughter esakal
क्रीडा

Video: डेव्हिड वॉर्नरच्या इंडीची 'एमसीजी'वर फटकेबाजी

अनिरुद्ध संकपाळ

सिडनी : ऑस्ट्रेलियाने अ‍ॅशेस मालिकेवर 3 - 0 असा कब्जा मिळवला आणि अ‍ॅशेस (Ashes) पुन्हा आपल्याकडेच राखल्या. यंदाच्या मालिकेत सलामीवीर डेव्हिड वॉर्नरच्या (David Warner) बॅटमधून चांगल्या धावा निघाल्या आहेत. त्याने ऑस्ट्रेलियाला चांगली सुरुवात करुन दिली. दरम्यान, डेव्हिड वॉर्नर प्रमाणेच त्याची मुलगी (David Warner Daughter) देखील फटकेबाजी करण्यात तरबेज आहे. नुकताच तिने मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर फलंदाजीचा आनंद लुटला.

जैसा बाप वैसी बेटी... डेव्हिड वॉर्नरची मुलगी इंडी (Indi) आपल्या वडिलांप्रमाणाचे फटकेबाजीत तरबेज आहे. खुद्द डेव्हिड वॉर्नरने आपली मुलगी इंडीने मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर केलेल्या फटकेबाजीचा व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केला आहे.

इंडी (Indi) ही डेव्हिड वॉर्नर आणि कॅडीस यांची दुसऱ्या क्रमांकाची मुलगी आहे. ती एमसीजीवर फलंदाजी करत होती. हा व्हिडिओ वॉर्नरने पोस्ट करत त्याला 'इंडीने एमसीजीवर (MCG) आपला पहिला फटका लगावला.' असे कॅप्शन दिले. (David Warner Daughter)

डेव्हिड वॉर्नरने अ‍ॅशेस मालिकेत (Ashes Series) आतापर्यंत खेळल्या गेलेल्या तीन सामन्यातील चार डावत 240 धावा केल्या आहेत. त्याने गाबा कसोटीत पहिल्या डावात 94 धावांची खेळी केली. तर अ‍ॅडलेड कसोटी पहल्या डावात 95 तर दुसऱ्या डावात 13 धावांची खेळी केली. याचबरोबर मेलबर्न कसोटीत देखील 38 धावांची खेळी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe Transfer : अभिनेत्यांना नोटीस बजावताच तुकाराम मुंढेंच्या बदलीची चर्चा? २१ वर्षांत २५ बदल्या; FDAमधील धडक कारवाईने पुन्हा चर्चेत

पोलिसांच्या मारहाणीत ५५ वर्षीय पुजाऱ्याचा मृत्यू, कुटुंबियांचे गंभीर आरोप, न्यायालयाकडून चौकशीचे आदेश, नेमकं काय घडलं?

Paithan Farmers: शेतात जाण्यास रस्ताच नाही! दोन वर्षे पाठपुरावा करूनही न्याय नाही; शेतकरी भावंडांचे आमरण उपोषण

AAMIR KHAN FITNESS: 61 व्या वर्षी देखील आमिर खान फिट कसा? केबीसीच्या सेटवरच सांगून टाकलं गुपित, म्हणाला... 'मी रोज सकाळी उठून...'

Marathi News Live Updates : व्हिडीओ शूटिंगच्या वादातून तरुणाची गच्चीवरून फेकून हत्या

SCROLL FOR NEXT