David Warner esakal
क्रीडा

David Warner: तब्बल हजार दिवसांनी शतक; डेव्हीड वॉर्नर भावूक

डेव्हिड वॉर्नरने दीर्घ काळानंतर आपल्या शतकाचा दुष्काळ संपवला आहे.

सकाळ डिजिटल टीम

डेव्हिड वॉर्नर पुन्हा फॉर्मात आला आहे. प्रदीर्घ काळानंतर आपल्या शतकाचा दुष्काळ संपवला आहे. त्याने इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात १०६ धावांची शतकी खेळी खेळली. त्याने १०४२ दिवसांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये झळकावले आहे. त्यामुळे चाहते त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. (David Warner smashes a hundred in international cricket after 1042 days)

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात एकदिवसीय मालिका खेळवण्यात आली. आज मालिकेतील अखेरचा अर्थात तिसरा सामना खेळवला जात आहे. कांगारूच्या संघाने पहिले दोन सामने जिंकून 2-0ने विजयी आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज डेव्हिड वॉर्नरने मंगळवारी तुफान फटकेबाजी केली. या सामन्यात वॉर्नरने 103.92 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत शतक झळकावले. एवढेच नाही तर यानंतर त्याने आपल्या एका छोट्या चाहत्याला भेट दिली, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा: गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

ऑस्ट्रेलियासाठी वनडेमध्ये सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत वॉर्नर नंबर-२ वर पोहोचला आहे. त्याने माजी दिग्गज मार्क वॉला मागे सोडले आहे.

डेव्हिड वॉर्नरनेइंग्लंडविरूद्धच्या अखेरच्या एकदिवसीय सामन्यामध्ये 102 चेंडूत 106 धावांची खेळी केली. यामध्ये 8 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश आहे. यानंतर त्याला ओली स्टोनने बाहेरचा रस्ता दाखवला. दरम्यान, पॅव्हेलियनमध्ये परतत असताना त्याने आपले ग्लोव्ह्ज चिमुकल्या चाहत्याला दिले. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur : शेतकऱ्यानं म्हशी घ्यायला ७ लाख साठवले, सहावीत शिकणाऱ्या लेकानं गेमवर ५ लाख उडवले; बँक स्टेटमेंट बघून बसला धक्का

India Vs England : दुसऱ्या कसोटीतील लाजीरवाण्या पराभवानंतर इंग्लंडचा मोठा निर्णय, 'या' वेगवान गोलंदाजाचा केला संघात समावेश

Weekly Astrology 7 to 13 July 2025: या आठवड्यात कोणत्या राशींना होणार आर्थिक लाभ अन् नोकरी व्यवसायत मिळेल उत्तम संधी, वाचा साप्ताहिक राशिभविष्य

Latest Maharashtra News Updates : चांदोरीतील गोदावरी नदीपात्राच्या बाहेर पाणी, खंडेराव महाराज मंदिराला पाण्याचा वेढा

Global Club Championship: पाकिस्तानला डावलण्याची शक्यता; जागतिक क्लब अजिंक्यपद स्पर्धा : पाच संघांचा सहभाग

SCROLL FOR NEXT