David Warner Share Bachchan Pandey Film Instagram Reel  esakal
क्रीडा

VIDEO: पाकिस्तानात गेलेल्या वॉर्नरला भुरळ मात्र इंडियन 'बच्चन पांडे'ची

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली: ऑस्ट्रेलियाचा (Australia) धडाकेबाज फलंदाज डेव्हिड वॉर्नर (David Warner) सध्या कसोटी मालिकेसाठी पाकिस्तान दौऱ्यावर (Australia Tour Of Pakistan) आहे. मात्र त्याची भारत आणि भारतातील चित्रपटांबद्दल असलेली क्रेझ कायम असून त्याने आपल्या अनोख्या अंदाजात दाखवून दिले. तसेही डेव्हिड वॉर्नर हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटातील गाणी आणि डायलॉगवर रील करून शेअर करत असतो. आता त्याने अक्षय कुमारचा आगामी चित्रपट बच्चन पांडेवर (Bachchan Pandey) एक इन्स्टाग्राम रील (Instagram Reels) तयार केला आहे. (David Warner Share Bachchan Pandey Film Instagram Reel)

सध्या बॉलीवूड स्टार अक्षय कुमारचा (Akshay Kumar) बहुप्रतिक्षित बच्चन पांडे हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. सध्या या चित्रपटातील डायलॉगची बरीच क्रेझ निर्माण झाली आहे. वॉर्नरलाही या चित्रपटातील डायलॉगची भुरळ पडली. त्याने यावरचा एक रील शेअर केला आहे. वॉर्नरने हा व्हिडिओ शेअर करताना अक्षय कुमारला टॅग करत हा आवडला का असे विचारले. हा व्हिडिओ सध्या फॅन्सच्या पसंतीस उतरत आहे.

डेव्हिड वॉर्नवच्या या व्हिडिओवर आजी माजी खेळाडू कमेंट करत आहेत. अनेकांनी या व्हिडिओला आयपीएलचा (IPL 2022) संदर्भही दिला आहे. काही तर म्हणत आहेत की सनरायजर्स हैदराबादबरोबर (SRH) काडीमोड झाल्यानंतर आता वॉर्नर टॉलीवूडला विसरला आहे. वॉर्नर सध्या पाकिस्तानात कोसटी मालिका (Test Series) खेळण्यासाठी दाखल झाला आहे. तब्बल 24 वर्षानंतर ऑस्ट्रेलिया पाकिस्तान दौरा करत आहे. या दौऱ्यात ऑस्ट्रेलिया कसोटी, वनडे आणि टी 20 सामन्यांची मालिका देखील खेळणार आहे. मात्र डेव्हिड वॉर्नरसह अनेक दिग्गज खेळाडूंना ऑस्ट्रेलियाने मर्यादित षटकांच्या सामन्यात विश्रांती दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar: अखेर वेळ ठरली! नितीश कुमार राजीनामा देणार; तारीख आली समोर, बिहारमध्ये २० वर्षांनंतर बदलाची चाहूल

IPL 2020 Point Table : विदर्भच्या पोट्ट्याने राजस्थानची 'वाट' लावली! Praful Hingeने इतिहास घडवताना हैदराबादला मिळवून दिला दणदणीत विजय, गुणतालिकेत बदल

Pune Accident: पुण्यात थरारक घटना! मद्यपी चालकाने तरुणाला फरफटत नेऊन चिरडले; हडपसर-सासवड रस्त्यावरील घटना, चालकाला अटक!

Mohol Crime: छळातून दुर्दैवी अंत; मोहोळमध्ये नवविवाहितेचा खून, नवरा व सासूला चार दिवसांची कोठडी!

तापमान ४२ अंशावर! ‘ही’ फळे खावा, नैसर्गिक पेये, आंबिल प्या; लहान मुलांची 'अशी' घ्या काळजी, वाचा...

SCROLL FOR NEXT