dc vs rcb
dc vs rcb sakal
क्रीडा

Sports : बेधडक दिल्ली कॅपिटल्सचा; बंगळूरलाही पराभवाचा धक्का

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - अगोदर लखनौ संघाला पराभवाचा धक्का देणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सने प्रगती करत असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरलाही हादरा दिला. १८२ धावांचे भले मोठे लक्ष्य सात विकेट आणि २० चेंडू राखून पार करून दिल्ली संघाने आयपीएलमधील आपले आव्हान कायम ठेवले.

विराट कोहली, फाफ डुप्लेसी आणि लोमरोर यांच्या आक्रमक फलंदाजीमुळे बंगळूर संघाने प्रथम फलंदाजी करताना १८१ धावा उभारल्या होत्या. एवढे मोठे आव्हान असूनही बेधडक फलंदाजी करणाऱ्या दिल्लीच्या फलंदाजांनी बंगळूरच्या गोलंदाजांना प्रतिकाराचीही संधी ठेवली नाही.

फिल सॉल्टने बंगळूरच्या प्रतिकारावर मिठ चोळताना ८७ धावांचा तडाखा दिला यात त्याने ८ चौकार आणि ६ षटकारांची पेरणी केली. अशी खेळी केली आणि बंगळूरच्या सर्वच गोलंदाजांची बेदम पिटाई केली. डेव्हिड वॉर्नर आणि मिशेल मार्श यांनी त्याला चांगली साथ दिली त्यामुळे दिल्लीचा धावफलक १२ ते १३ धावांच्या सरासरीने धावत होता. तेथेच त्यांचा विजय निश्चित झाला होता.

दिल्ली संघाने गुणतक्त्यात प्रथमच तळाच्या स्थानातून पुढे प्रगती केली आहे आता ते १० संघात नवव्या क्रमांकावर आहेत. या पराभवानंतर बंगळूरचे पाचवे स्थान मात्र कायम राहिले आहे.

संक्षिप्त धावफलक

बंगळूर ः २० षटकांत ४ बाद १८१ (विराट कोहली ५५ - ४६ चेंडू, ५ चौकार, फाफ डुप्लेसी ४५ - ३२ चेंडू, ५ चौकार, १ षटकार, महिपाल लोमरोर नाबाद ५४ - २९ चेंडू, ६ चौकार, ३ षटकार, मुकेश कुमार ३-०-३०-१, मिशेल मार्श ३-०-२१-२) पराभूत वि. दिल्ली ः १६.४ षटकांत ३ बाद १८७ (डेव्हिड वॉर्नर २२ -१४ चेंडू, ३ चौकार, १ षटकार, फिल सॉल्ट ८७ - ४५ चेंडू, ८ चौकार, ६ षटकार, मिशेल मार्श २६ -१७ चेंडू, ३ चौकार, १ षटकार, रॉसो नाबाद ३५ - २२ चेंडू, १ चौकार, ३ षटकार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ब्रिटिश साम्राज्याच्या लोकशाहीतील पाऊलखुणा

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 04 मे 2024

राजकीय पक्षांच्या नजरेतून स्त्रियांचे प्रश्‍न

आयुर्वेदिक पंचकर्म

रक्तातील साखरेचे ‘हिस्टरी बुक’

SCROLL FOR NEXT