WPL 2024 Auction  esakal
क्रीडा

WPL 2024 Auction : पहिल्या हंगामात भूतबाधा झाल्याचा दावा; दुसऱ्या हंगामाच्या लिलावासाठी डिएन्ड्राने पुन्हा केली नोंदणी

अनिरुद्ध संकपाळ

WPL 2024 Auction : महिला प्रीमियर लीग 2024 चा लिलाव 9 डिसेंबरला होणार आहे. यासाठी एकूण 165 महिला क्रिकेटपटूंनी नोंदणी केली आहे. यात 15 देशातील खेळाडूंचा देखील समावेश आहे. लिलावासाठी तीन श्रेणी करण्यात आल्या आहेत. कॅप्ड, अनकॅप्ड आणि असोसिएट देश अशा तीन श्रेणीत खेळाडूंची विभागणी केली आहे.

विशेष म्हणजे यंदाच्या लिलावात वेस्ट इंडीजची वादग्रस्त खेळाडू डिएन्ड्रा डोटिनने देखील नोंदणी केली आहे. गेल्या हंगामात गुजरात जायंट्सने तिला 60 लाख रूपये खर्चून संघात घेतलं होतं. मात्र ती कथित वैद्यकीय कारणामुळे स्पर्धा अर्ध्यात सोडून गेली होती. त्यावेळी तिने तिला भूतबाधा झाल्याचा देखील दावा केला होता. आता तिने पुन्हा नोंदणी केली आहे.

यंदाच्या WPL लिलावात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेल्या खेळाडूंची बेस प्राईस ही 30 लाख असणार आहे तर अनकॅप्ड आणि असोसिएट देशातील खेळाडूंची बेस प्राईस ही 10 लाख रूपये आहे.

भारताच्या कॅप्ड प्लेअर वेदा कृष्णमूर्ती, पुनम राऊत आणि मेघना सिंह यांना देखील लिलावाला सामोरे जावे लागणार आहे. तसेच श्रीलंकेची चामिरी अटापटू, डिएन्ड्रा डोटिन आणि शबनिम इस्माईल या आंतरराष्ट्रीय स्तरावारील खेळाडूंवरही यंदाच्या लिलावात सर्वांचे लक्ष असणार आहे.

यंदाच्या लिलावात 165 खेळाडूंनी नोंदणी केली आहेत. त्यात 15 असोसिएट देशातील आहेत. 94 खेळाडू अनकॅप्ड तर 56 कॅप्ड खेळाडू आहेत. यात 18 वर्षाच्या निशा सैना सारख्या तर एकता बिश्त सारख्या अनुभवी खेळाडूंचा देखील समावेश आहे.

वुमन्स प्रीमियर लीगमधील पाच खेळाडूंनी एकूण 60 खेळाडू रिटेन केले आहेत. यात 39 भारतीय तर 12 विदेशी खेळाडूंचा समावेश आहे. आता या पाच संघांना मिळून 30 स्लॉट भरायचे आहेत. यात 21 भारतीय तर 9 विदेशी खेळाडूंचा समावेश असेल.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : शक्तीपीठ विरोधात १३ जिल्ह्यांत जमीन मोजणीला वेग?, लातूर, हिंगोलीतून विरोधक एकवटणार; कोल्हापुरातील बैठकीत नेमकं काय घडलं

Mumbai: पनवेल-कर्जत लोकल लवकरच सुरु होणार, दररोज ५० गाड्या धावणार; प्रवाशांना दिलासा मिळणार!

Congress High Drama : "कसले अध्यक्ष?"; विचारताच काँग्रेस कार्यालयात तुफान राडा, नेत्यांवर थेट चप्पल-बुटांचा मारा!

Someshwar Sugar Factory: सोमेश्वर कारखान्याच्या मतमोजणीसाठी वाहतुकीत बदल; बारामती-निरा मार्गावरील रस्ता २४ तास बंद, नेमका कसा असेल बदल?

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

SCROLL FOR NEXT