India vs Sri Lanka 1st T20I Deepak Hooda Axar Patel Partnership esakal
क्रीडा

IND vs SL : दीपक हुड्डाचा झंजावात; भारताची शेवटच्या 5 षटकात वाचली लाज

अनिरुद्ध संकपाळ

India vs Sri Lanka 1st T20I : श्रीलंकेविरूद्धच्या पहिल्याच सामन्यात भारताची अवस्था 5 बाद 94 धावा अशी झाली असताना दीपक हुड्डाने झुंजार खेळी करत भारताला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. त्याने अक्षर पटेलच्या साथीने सहाव्या विकेटसाठी 35 चेंडूत नाबाद 68 धावांची धडाकेबाज भागीदारी रचली. यामुळे 15 व्या षटकात 5 बाद 94 अशी अवस्था झालेल्या भारताने 20 षटकात 5 बाद 162 धावांपर्यंत मजल मारली. दीपक हुड्डाने 4 षटकार आणि 1 चौकारसह नाबाद 41 धावा केल्या तर अक्षर पटेलने 20 चेंडूत नाबाद 31 धावा करून त्याला चांगली साथ दिली.

श्रीलंकेने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी करण्यास पाचारण केले. सलामीवीर इशान किशनने पहिल्या षटकात धमाका केला. त्याने 2 चौकार आणि 1 षटकार मारत रजिताला 17 धावा चोपल्या. त्यानंतर पदार्पण करणाऱ्या शुभमन गिलने देखील चौकार मारत दमदार सुरूवात केली.

मात्र त्यानंतर श्रीलंकेने भारताला एका मागून एक धक्के देण्यास सुरूवात केली. तीक्षाणाने गिलला 7 धावांवर बाद केले. त्यानंतर सूर्यकुमार यादव देखील 7 धावांची भर घालून माघारी परतला. त्यानंतर आलेल्या संजू सॅमसनला देखील मिळालेल्या जीवनदानाचा फायदा उचलता आला नाही. तो 5 धावा करून माघारी फिरला.

भारताची टॉप ऑर्डर माघारी गेल्यानंतर हार्दिक पांड्या आणि इशान किशन यांनी डाव सावरत भारताला 11 षटकात 77 धावांपर्यंत पोहचवले. मात्र हसरंगाने सेट झालेल्या इशानला 37 धावांवर बाद करत भारताला चौथा आणि मोठा धक्का दिला. आता सर्व मदार कर्णधार पांड्यावर असताना तो देखील 27 चेंडूत 29 धावा करून संघाने शंभरी पार करण्यापूर्वीच पॅव्हेलियनमध्ये पोहचला. (Sports Latest News)

मात्र त्यानंतर दीपक हुड्डा आणि अक्षर पटेल यांनी दमदार भागीदारी रचत 35 चेंडूत 68 धावांची भागीदारी रचली. यात दीपक हुड्डाच्या 23 चेंडूत केलेल्या नाबाद 41 धावांचा मोठा वाटा होता. हुड्डाने 4 षटकार आणि 1 चौकार मारला. त्याला अक्षर पटेलने 20 चेंडूत 31 धावा करत चांगली साथ दिली. दोघांनी लंकेसमोर 162 धावांचे आव्हान ठेवले.

हेही वाचा : ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune-Mumbai Train Cancelled : पुणे- मुंबई प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! सर्व रेल्वे गाड्या रद्द, पाहा संपूर्ण यादी

Post Office Scheme: रोज फक्त 50 रुपये गुंतवा आणि मिळवा तब्बल 35 लाखांचा फंड; काय आहे योजना?

Rain-Maharashtra Latest live news update: कोल्हापूर ब्रेकिंग : मुसळधार पावसामुळे भिंत कोसळली, तिघे जखमी

रेड, ऑरेंज, यलो, ग्रीन अलर्ट म्हणजे काय रे भाऊ? अर्थ आणि महत्त्व जाणून घ्या...

Solapur Rain Update: मुंबईत मुसळधार! ‘वंदे भारत’ रद्द, ‘सिद्धेश्वर’ मुंबईऐवजी पुण्यातून; रेल्वेगाड्या उशिरा सुटल्याने प्रवासी त्रस्त

SCROLL FOR NEXT