World Boxing Championship sakal
क्रीडा

World Boxing Championships : दीपक, हुसामुद्दीन, निशांतचा दमदार पंच

जागतिक बॉक्सिंग स्पर्धा : उपांत्य फेरी गाठत पदक पक्के

सकाळ वृत्तसेवा

ताश्‍कंद : दीपक भोरिया, मोहम्मद हुसामुद्दीन व निशांत देव या भारताच्या बॉक्सर्संनी बुधवारी प्रतिस्पर्ध्यांना बॉक्सिंगच्या रिंगणात दमदार पंचेस मारत जागतिक बॉक्सिंग स्पर्धेतील आपापल्या गटात उपांत्य फेरीत प्रवेश केला आणि प्रतिष्ठेच्या स्पर्धेतील पदक पक्के केले.

आता त्यांना किमान ब्राँझपदक पटकावता येणार आहे. जागतिक स्पर्धेमध्ये सर्वाधिक तीन पदके निश्‍चित करण्याची भारताची ही पहिलीच खेप. याआधी २०१९ मध्ये भारताने अमित पांघल व मनीष कौशिक यांनी पदक जिंकली होती.

पहिल्या लढतीत दीपक भोरिया याने ५१ किलो वजनी गटात किर्गीस्तानच्या दीयुशेबेव नुरझीगीत याचा ५-० असा धुव्वा उडवला आणि उपांत्य फेरीत प्रवेश केला. आता त्याच्यासमोर उपांत्य फेरीच्या लढतीत फ्रान्सच्या बी. बेन्नामा याचे आव्हान असणार आहे.

दीपकने पहिल्या व दुसऱ्या फेरीत आक्रमक खेळ करीत नुरझीगीत याच्यावर वर्चस्व गाजवले. त्यानंतर तिसऱ्या फेरीत नुरझीगीत याने आक्रमक खेळ करीत दीपकवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने संयमी खेळ करीत त्याचे आक्रमण थोपवून लावले आणि विजय साकारला.

मोहम्मद हुसामुद्दीन याने ५७ किलो वजनी गटात बुल्गेरियाच्या जे. डियाज इल्बानेज याचे कडवे आव्हान ४-३ असे परतवून लावत अंतिम चारमध्ये प्रवेश केला. दोन खेळाडूंमध्ये कडवी झुंज पाहायला मिळाली. पहिल्या फेरीत हुसामुद्दीन याला प्रतिस्पर्ध्याचा खेळाचा अंदाज घेता आला नाही, पण दुसऱ्या फेरीत हुसामुद्दीन याने झोकात पुनरागमन केले. अखेरच्या फेरीत हुसामुद्दीन याने संयम व आक्रमण याचा योग्य मिलाफ करीत विजयावर मोहोर उमटवली.

निशांत देव याने भारताचे तिसरे पदक पक्के केले. त्याने ७१ किलो वजनी गटात क्युबाच्या जॉर्ज क्युलर याच्यावर ५-० असा दणदणीत विजय साकारला. निशांतसमोर जास्त उंची असलेल्या खेळाडूचे आव्हान होते, पण निशांतने शानदार पंचेसच्या जोरावर ही लढत आपल्या नावावर केली. निशांतला उपांत्य फेरीत कझाकस्तानच्या अस्लानबेक सामबर्गेनोव याचा सामना करावयाचा आहे.

जागतिक स्पर्धेतील पदकवीर

भारताच्या दीपक भोरिया, मोहम्मद हुसामुद्दीन व निशांत देव या तीन बॉक्सर्संनी यंदा ताश्‍कंद येथे सुरू असलेल्या स्पर्धेमध्ये पदक पक्के केले आहे. त्याआधी भारताच्या सात बॉक्सर्संनी जागतिक या मानाच्या स्पर्धेमध्ये पदक जिंकण्याची किमया करून दाखवली आहे. २००९ मध्ये विजेंदर सिंग याने ब्राँझपदक पटकावले होते.

२०११ मध्ये विकास क्रिशन याने ब्राँझपदकाला गवसणी घातली होती. २०१५ मध्ये शिव थापा याने ब्राँझपदक जिंकले. २०१७ मध्ये गौरव बिधुरी याने आणि २०१९ मध्ये मनीष कौशिक याने ब्राँझपदकाला गवसणी घातली होती. २०१९ मध्येच अमित पांघालला रौप्यपदक जिंकता आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs RR Live: इशान किशन बरसला, हेनरिच क्लासनही जबरदस्त खेळला; पण, राजस्थानच्या गोलंदाजांचे पुनरागमन, नितीश रेड्डी भिडला

MPSC पदसंख्या वाढ, मेडिकल कौन्सिल नियमांमध्ये बदल अन्...; मंत्रिमंडळ बैठकीत महायुती सरकारचे ८ महत्त्वाचे निर्णय

MPSC Success Story: पहुरजिऱ्याचा अजय दिघडेचा पराक्रम; MPSC उत्तीर्ण होऊन असिस्टंट कमिशनर पदावर झेप, आई-वडिलांच्या कष्टांना यशाची किनार..

SRH vs RR Live: इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले! पण, जिंकली Orange Cap; झेल घेताना दोन खेळाडू एकमेकांना आपटले

Gadchiroli Health: कोरची तालुक्यात गरोदर मातेसह बाळाचा मृत्यू; आशा वर्करची टाळाटाळी, रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता अन्..

SCROLL FOR NEXT