Crime News sakal
क्रीडा

Crime News : महिला खेळाडूचा विनयभंग,प्रशिक्षकास अटक ; म्हापसा पोलिसांकडून दीपक शर्माला अटक

दोन महिला फुटबॉल खेळाडूंचा विनयभंग करून त्यांना मारहाण केल्याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचा (एआयएफएफ) कार्यकारी समिती सदस्य हिमाचल प्रदेशमधील दीपक शर्मा यांच्याविरुद्ध शनिवारी गुन्हा दाखल केला व त्याला अटक करण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

म्हापसा : दोन महिला फुटबॉल खेळाडूंचा विनयभंग करून त्यांना मारहाण केल्याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचा (एआयएफएफ) कार्यकारी समिती सदस्य हिमाचल प्रदेशमधील दीपक शर्मा यांच्याविरुद्ध शनिवारी गुन्हा दाखल केला व त्याला अटक करण्यात आली.

याप्रकरणी हिमाचल प्रदेशातील खाड फुटबॉल अकादमी या क्लबची २१ वर्षीय महिला खेळाडू ही तक्रारदार आहे. तक्रारदाराच्या दाव्यानुसार, संशयिताने सदर कृत्य केले तेव्हा तो दारूच्या नशेत होता. उपलब्ध माहितीनुसार, हा विनयभंग तथा मारहाणीचा प्रकार २४ ते २८ मार्च २०२४ या कालावधीत पेडे-म्हापसा येथील एका व्हिलामध्ये घडला. फिर्यादी ही हिमाचल प्रदेशातील खाड फुटबॉल अकादमी संघाची खेळाडू असून संशयित दीपक शर्मा याच संघाचे अधिकारीही आहेत.

सध्या म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर सुरू असलेल्या इंडियन वुमन लीग-२ फुटबॉल स्पर्धेतील क गटातील सामने सुरू आहे. या स्पर्धेच्या दरम्यान हॉटेलच्या खोलीत महिला खेळाडूंना मारहाण झाली. संशयित दीपक शर्मा हिमाचल प्रदेश फुटबॉल संघटनेचा सचिव व एआयएफएफ स्पर्धा समितीचा उपाध्यक्ष आहे.

तक्रारीनुसार, दीपक शर्मा दारूच्या नशेत २१ वर्षीय फिर्यादीच्या खोलीत घुसला व त्याने फिर्यादीस मारहाण केली. त्यानंतर पुन्हा थोड्या वेळाने संशयित हा महिला खेळाडूच्या रूममध्ये घुसला व दुसऱ्या एका १८ वर्षीय खेळाडूच्या कानशिलात मारली.

महासंघाकडून समिती

महिला फुटबॉलपटू विनयभंग व मारहाण प्रकरणाची अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष कल्याण चौबे यांनी गंभीर दखल घेतली. महासंघाच्या वरिष्ठ सदस्यांची तातडीची बैठक शनिवारी बोलावण्यात आली. बैठकीस चौबे यांच्यासह प्रभारी सचिव एम. सत्यनारायणन, महिला समितीच्या प्रमुख वालंका आलेमाव, स्पर्धा समितीचे अध्यक्ष अनिलकुमार प्रभाकरन, महासंघाचे कार्यकारी सदस्य विजय बाली व मुलराजसिंह चुडासमा यांनी उपस्थिती लावली. या प्रकरणी महासंघाने तीन सदस्यीय चौकशी स्थापन केली. या समितीने सखोल चौकशी करून सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश महासंघाच्या अध्यक्षांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Nasrapur crime: आरोपीला मध्यरात्री घटनास्थळी नेले अन्... ; नसरापूर अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा

Angarki Sankashti 2026 : गणपतीपुळेत लोटला भाविकांचा महासागर! अंगारकीला 70 हजार भक्तांनी घेतले दर्शन; 80 लाखांची उलाढाल

Jalna Crime: पारधमध्ये ‘लव्ह जिहाद’! दहा वर्षांपासून पीडितेवर अत्याचार, जालन्यातून दोन संशयित अटकेत!

Ganga Godavari Maha Aarti : नाशिकमध्ये आज गंगा-गोदावरी महाआरती; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत रंगणार सोहळा, वाहतुकीत मोठे बदल

Latest Marathi News Live Update : रायगडात पाणीटंचाईचा धोका वाढला; २८ धरणांत केवळ २९ टक्के पाणीसाठा शिल्लक

SCROLL FOR NEXT