Deepika Kumari | Archery at Paris Olympic 2024  Sakal
क्रीडा

Paris Olympic 2024: दीपिका कुमारीच्या पराभवासह भारताचा तिरंदाजीतील पदकाचा दुष्काळ कायम! पुढच्या ऑलिम्पिकची प्रतीक्षा

India Archer Deepika Kumari: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तिरंदाजीत भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे. महिलांच्या गटात दीपिका कुमारीला क्वार्टरफायनलमध्ये पराभवाचा धक्का बसला.

Pranali Kodre

Deepika Kumari in Archery at Paris Olympic 2024: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत भारताची अनुभवी तिरंदाज दीपिका कुमारी शनिवारी (३ ऑगस्ट) उपांत्य फेरीत स्थान मिळवण्यात अपयशी ठरली. त्यामुळे तिरंदाजीतील भारताचं आव्हानही संपुष्टात आलं.

तिला उपांत्यपूर्व फेरीत कोरियाच्या स्युयॉन नाम हिने पराभूत केले. त्यामुळे चौथ्यांदा ऑलिम्पिकमध्ये खेळताना दीपिकाला पदक जिंकण्यात अपयश आले. दीपिकाने शेवटपर्यंत झुंज दिली मात्र, अखेरच्या सेटमध्ये १९ वर्षीय कोरियन खेळाडूने तिला मात दिली.

उपांत्यपूर्व सामन्यात पहिल्या सेटमध्ये दीपिकाने २८-२६ पाँइंट्सने आघाडी घेत २ गुण मिळवले. मात्र दुसऱ्या सेटमध्ये दीपिकाला २५-२८ अशा पाँइंट्सने पिछाडी स्विकारावी लागली. तिसऱ्या सेटमध्ये दीपिकाने २९-२८ अशी आघाडी घेत आणखी २ गुण मिळवले.

मात्र चौथ्या सेटमध्ये दीपिकाला पुन्हा २७-२९ अशा फरकाने पिछाडी स्विकारावी लागली. त्यामुळे ४-४ अशी गुणांची बरोबरी झाली आणि सामना निर्णायक पाचव्या सेटमध्ये गेला. पाचव्या सेटमध्येही कोरियाच्या स्युयॉन नामने २७-२९ असा दीपिकाच्या पराभव करत सामना जिंकला आणि उपांत्य फेरीत प्रवेश केला.

दरम्यान, यासह भारताची तिरंदाजीत ऑलिम्पिक पदक जिंकण्याची प्रतिक्षाही लांबली आहे. तिरंदाजीत भारताला आत्तापर्यंत ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकता आलेलं नाही.

याआधी शुक्रवारी धीरज बोम्मादेवरा आणि अंकिता भकत मिश्र गटात कांस्य पदकाचा सामना खेळले, मात्र त्यांना अमेरिकेच्या जोडीने पराभूत केले. त्यामुळे भारताचे तिरंदाजीतील पदक शुक्रवारी थोडक्यात हुकले होते.

उपउपांत्यपूर्व सामन्यात मिळवलेला विजय

दरम्यान, शनिवारी उपउपांत्यपूर्व फेरीत दीपिकाने जर्मनीच्या मिचेल क्रोपेनला ६-४ फरकाने पराभूत केले होते. या सामन्यात तिने पहिल्या सेटमध्ये २७-२४ पाँइंट्सने विजय मिळवत २ गुण मिळवले, त्यानंतर दुसरा सेट २७-२७ पाँइंट्सने बरोबरीत राहिल्याने १-१ गुण दोघींना मिळाला. तिसऱ्या सेटमध्ये दिपीकाने २६-२५ पाँइंट्सने विजय मिळवत आणखी २ गुण मिळवले.

पण चौथ्या सेटमध्ये क्रोपेनने पुनरागमन करत २९-२७ असा जिंकत २ पाँइंट्स मिळवले. त्यामुळे पाचवा सेट महत्त्वाचा होता. यामध्ये २७-२७ अशी बरोबरी झाल्याने दोघींना पुन्हा १-१ गुण मिळाला. त्यामुळे दिपीकाचा विजय देखील निश्चित झाला होता.

तथापि, उपउपांत्यपूर्व फेरीत दीपिकासह भारताची भजन कौरही सहभागी झाली होती. पण तिला इंडोनेशियाच्या डायनंदा कोइरुनिसाविरुद्ध शुटऑफमध्ये ५-६ असा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे तिचे आव्हान संपले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe : कामातचं नाही सोशल मीडियावरही तुकाराम मुंढेंचा जलवा; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, विश्वास नांगरे- पाटलांना टाकलं मागे

Nipani Tavandi Ghat Case : राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटाजवळ दगडाने ठेचून गडहिंग्लज साखर कारखान्यातील कर्मचाऱ्याचा खून; महमदवर धारदार शस्रानेही हल्ला

China Nepal Border: मृत्यूचे तांडव डोळ्यांसमोर पाहतोय! प्रत्यक्षदर्शीचा अनुभव; चीन-नेपाळ सीमेवर अडकले राज्यातील ४०० भाविक

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

SCROLL FOR NEXT