Deepthi Jeevanji Para Athletics Championship sakal
क्रीडा

Deepthi Jeevanji : भारत की बेटी सब पर भारी... दीप्तीने जपानमध्ये रचला इतिहास! 400 मीटर T20 शर्यतीत जिंकले 'गोल्ड मेडल'

Deepthi Jeevanji Para Athletics Championship : भारताच्या दीप्ती जीवनजीने जपानमधील कोबे येथे झालेल्या जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये महिलांच्या 400 मीटर T20 शर्यतीत 55.07 सेकंदांच्या विश्वविक्रमासह सुवर्णपदक जिंकले.

Kiran Mahanavar

Deepthi Jeevanji Para Athletics Championship: भारताच्या दीप्ती जीवनजीने जपानमधील कोबे येथे झालेल्या जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये महिलांच्या 400 मीटर T20 शर्यतीत 55.07 सेकंदांच्या विश्वविक्रमासह सुवर्णपदक जिंकले.

यासोबतच दीप्ती जीवनजी हिला पॅरिस ऑलिम्पिकनंतर होणाऱ्या पॅरालिम्पिक स्पर्धेचा कोटाही मिळाला आहे. पॅरा वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या ट्रॅक इव्हेंटमध्ये प्रथमच भारतीय खेळाडूने सुवर्णपदक जिंकले आहे.

दीप्ती जीवनजीने अमेरिकेच्या ब्रायना क्लार्कचा विश्वविक्रम मोडला. तिने गेल्या वर्षी पॅरिसमध्ये 55.12 सेकंदांचा वेळ नोंदवला होता. तुर्कीच्या एसील ओंडरने 55.19 सेकंद वेळेसह दुसरे स्थान पटकावले, तर इक्वेडोरच्या लिजनशेला एंगुलोने 56.68 सेकंद वेळेसह तिसरे स्थान पटकावले.

भारताने आतापर्यंत जिंकली 4 पदके

यापूर्वी, पॅरा ॲथलेटिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिप 2024 मध्ये, भारताच्या प्रीती पालने महिलांच्या 200 मीटर T35 प्रकारात कांस्यपदक जिंकले होते. जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2024 मध्ये भारताने आतापर्यंत एक सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कांस्यपदके जिंकली आहेत.

जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या मागील आवृत्तीत, भारताने तीन सुवर्ण, चार रौप्य आणि तीन कांस्यांसह विक्रमी 10 पदके जिंकली होती. जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 25 मे 2024 पर्यंत चालणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Latest Maharashtra News Updates : यापुढे कुणालाही मारलं तर त्याचे व्हिडीओ काढू नका - राज ठाकरे

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT