Deepti Sharma esakal
क्रीडा

Deepti Sharma: रचला इतिहास! जे कुणालाही जमलं नाही ते दीप्तीने करून दाखवलं

Kiran Mahanavar

Deepti Sharma IND vs WI Women T20 World Cup : महिला T20 विश्वचषक 2023 च्या ब गटातील महत्त्वाचा सामना भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळला जात आहे. वेस्ट इंडिजच्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना त्यांना 20 षटकात 6 गडी गमावून केवळ 118 धावा करता आल्या. भारताकडून दीप्ती शर्माने दमदार गोलंदाजी करताना तीन विकेट घेतल्या आणि इतिहास रचला आहे.

दीप्ती शर्माने या सामन्यात चार षटकांत 15 धावा देत तीन विकेट घेतल्या. तीन विकेट घेतल्यानंतर दीप्ती टी-20 मध्ये भारतासाठी सर्वाधिक बळी घेणारी गोलंदाज ठरली आहे. या प्रकरणात त्याने पूनम यादवला मागे टाकले आहे. पूनमने आतापर्यंत 98 विकेट घेतल्या आहे. याशिवाय दीप्तीने आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये 100 विकेट्स पूर्ण केल्या आहेत.

पुरुष आणि महिला अशा दोन्ही टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 100 बळींचा टप्पा गाठणारी ती पहिली भारतीय आहे. भारताच्या पुरुष क्रिकेटपटूंमध्ये युझवेंद्र चहलच्या नावावर सर्वाधिक त्याने 91 विकेट्स आहेत. 0दीप्तीने भारतासाठी आतापर्यंत 89 टी-20 सामन्यांत 100 विकेट घेतल्या आहेत. आंतरराष्ट्रीय टी-20मध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम वेस्ट इंडिजच्या अनिसा मोहम्मदच्या नावावर आहे. त्याने 125 विकेट घेतल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadi Wari 2025: पंढरीची वारी पोचली लंडनच्या दारी!विठ्ठल-रुक्मिणीच्या पादुकांसह २२ देशांतून ७० दिवसांचा प्रवास

मोठी बातमी! १८ वर्षांत सोलापुरातील ५८ डीएड महाविद्यालयांना कुलूप; यंदा प्रवेश क्षमता १५०० अन्‌ शिक्षक होण्यासाठी अर्ज केले अवघ्या १०३८ विद्यार्थ्यांनीच

Panchang 5 july 2025: आजच्या दिवशी शनिदेवांना उडीद वड्याचा नैवेद्य दाखवावा

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

आजचे राशिभविष्य - 5 जुलै 2025

SCROLL FOR NEXT