MS Dhoni vs Mihir Diwakar News News in marathi Sakal
क्रीडा

MS Dhoni : धोनीचा पाय गोत्यात! माहीविरोधात मानहानीचा खटला दाखल, काय आहे संपूर्ण प्रकरण?

MS Dhoni vs Mihir Diwakar News : Know what is the whole matter?

Kiran Mahanavar

टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनीशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. धोनीचा माजी बिझनेस पार्टनर मिहिर दिवाकर आणि दिवाकरची पत्नी सौम्या दास यांनी दिल्ली उच्च न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला आहे. नुकतेच धोनीने आपल्या दोन जुन्या व्यावसायिक भागीदारांवर फसवणुकीचा आरोप केला होता. हे संपूर्ण प्रकरण 15 कोटी रुपयांशी संबंधित आहे.

पीटीआयच्या रिपोर्टनुसार, माहीचा बिझनेस पार्टनर धोनीविरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे. मिहिर दिवाकर आणि त्याची पत्नी सौम्या दास यांनी धोनीविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला आहे.

मिहिर दिवाकर म्हणतो की, त्याने धोनीसोबत कोणतीही फसवणूक केलेली नाही, तरीही सोशल मीडियावर त्याला ट्रोल केले जात आहे. धोनीने त्याच्या विरोधात चुकीच्या बातम्या पसरवल्या आहेत, त्यामुळे त्याचा खूप अपमान झाला आहे. याच कारणावरून मिहिर दिवाकर आणि त्याच्या पत्नीने धोनीविरोधात तक्रार दाखल केली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण

या प्रकरणाची सुनावणी 18 जानेवारी रोजी दिल्ली उच्च न्यायालयात होणार आहे. न्यायमूर्ती प्रतिभा एम सिंग यांच्या खंडपीठासमोर उद्या धोनीविरोधातील याचिकेवर सुनावणी होणार आहे. धोनीने स्पोर्ट्स मॅनेजमेंट कंपनी 'अर्का स्पोर्ट्स'चे संचालक मिहिर दिवाकर आणि त्याची पत्नी सौम्या दास यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.

या खटल्याची माहिती देताना धोनीच्या वकिलाने सांगितले की, मिहिर दिवाकर आणि त्याची पत्नी सौम्या दास यांनी 2017 मध्ये धोनीशी भारतात आणि परदेशात क्रिकेट अकादमी स्थापन करण्याबाबत बोलले होते. या व्यवसायात असा करार झाला होता की नफा धोनी आणि त्याच्या व्यावसायिक भागीदारामध्ये सरासरी 70:30 टक्के विभागला जाईल, परंतु धोनीच्या भागीदाराने पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे हा वाद सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिनचा 'अजिंक्य' मानला जाणारा विक्रम मोडला जाणार? ECB चा मास्टरस्ट्रोक, Joe Root सोबत केला खास करार

Yavatmal News : शिंदेसेनेचा गड आला, पण सिंह गेला! मध्यवर्ती बँकेत शिंदेसेना ठरली युतीत ‘मोठा भाऊ’; काँग्रेसची सत्ता उलथवली, प्रतिष्ठेच्या लढतीत दिग्गजांना धक्के

Karmad News : पीएम धन-धान्य कृषी योजनेतील कामगिरीबद्दल जिल्ह्याचा दिल्लीत गौरव

Ramlila Maidan Protest: रामलीला मैदानाचं एका दिवसाचं भाडं 1 लाख 21 हजार रुपये; पण यावर्षी केवळ तीनच दिवस उपलब्ध

MPSC Student Agitation : आंदोलन थांबले, पण असंतोष कायम; ‘एमपीएससी’ अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी अपूर्णच

SCROLL FOR NEXT