lovlina borgohain vs arundhati choudhary  Sakal
क्रीडा

ऑलिम्पिक चॅम्पियन विरुद्ध पंगा; ती कोर्टात पोहचली, अन् जिंकलीही

दिल्ली उच्च न्यायालयाने या प्रकरणातील सुनावणीवेळी अरुंधतीच्या बाजूने निर्णय दिला.

सुशांत जाधव

दिल्ली उच्च न्यायालयाने महिला बॉक्सर अरुंधती चौधरीला मोठा दिलासा दिला आहे. अरुंधतीने बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया (Boxing Federation of India) च्या विरोधात न्यायालयात धाव घेतली होती. महिला जागतिक बॉक्सिग चॅम्पियनशिपसाठी ऑलिम्पिक रौप्य पदक विजेत्या बॉक्सर लवलिना बोर्गोहेन (Lovlina Borgohain) हिला ट्रायलशिवाय टीम इंडियात सामील करुन घेतल्याचा आक्षेप अरुंधतीने नोंदवला होता.

बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाने तुर्कीमध्ये होणाऱ्या महिला जागतिक बॉक्सिंग स्पर्धेसाठी ऑलिम्पिक चॅम्पियन लवलिना बोर्गोहेन हिला टीम इंडियात स्थान दिले होते. त्यानंतर राजस्थानमधील कोटा येथील बॉक्सर अरुंधती चौधरीने फेडरेशनच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिले होते.

कोर्टाने अरुंधतीच्या बाजूने दिला निर्णय

दिल्ली उच्च न्यायालयाने या प्रकरणातील सुनावणीवेळी अरुंधतीच्या बाजूने निर्णय दिला. जागतिक वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी लवलिना बोर्गोहेन आणि अरुंधती यांच्यात ट्रायल घ्यावी, असे आदेश न्यायालयाने बॉक्सिंग फेडरेशनला दिले आहेत. दोघींमध्ये होणाऱ्या ट्रायल लढतीमध्ये जिंकणाऱ्या महिला बॉक्सरला 70 किलो वजनी गटात टीममध्ये सामील करुन घ्यावे लागेल. न्यायालयाच्या निर्णयानंतर बॉक्सिंग फेडरेशन बॅकफूटवर आला आहे.

ट्रायलसाठी सज्ज आहे अरुंधती

बॉक्सर अरुंधती चौधरी ट्रायलसाठी तयार आहे. तिने आशियाईतील बेस्ट बॉक्सरचा पुरस्कारही मिळवलाय. याशिवाय तिने तीन आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदकाची कमाई केली आहे. काही दिवसांपूर्वीच नॅशनल यूथ वर्ल्ड बॉक्सिंग वुमन चॅम्पियनशिपमध्ये तिने सुवर्ण पदकाची कमाई केली होती.

काय आहे नेमकं प्रकरण

तुर्कीमध्ये होणाऱ्या जागतिक बॉक्सिंग स्पर्धेसाठी बॉक्सिंग फेडरेशनने ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणाऱ्या लवलिना बोर्गोहेन हिची 70 किलो वजनी गटात निवड केली होती. याच गटात अरुंधती चौधरीही खेळते. लवलिना बोर्गोहेन हिला ट्रायलमध्ये मी वारंवार पराभूत केले आहे. त्यामुळे या गटात आपलीही दावेदारी भक्कम असल्याचे अरुंधतीने म्हटले होते. बॉक्सिंग फेडरेशनने या स्पर्धेसाठी माझ्या नावाचा विचार न करणे हा अन्याय आहे, असेही ती म्हणाली होती. न्यायासाठी तिने उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आणि तिला न्यायही मिळाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Adityanath Mobile Number: अधिकारी काम करत नाहीत? CM योगींकडे करा थेट तक्रार! मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा मोबाईल नंबर

Harbhajan Singh : रोहित शर्माला ODI कर्णधारपदावरून हटवल्याने हरभजन सिंग खवळला, शुभमन गिलबाबत म्हणाला...

Marathi Movie : तरूणाईला प्रेमाचा जादुई अनुभव देणारं ‘ये ना पुन्हा’ गाणं प्रदर्शित!

Ajit Agarkar: रोहित शर्मासाठी परतीचा प्रवास सुरू? कर्णधारपदावरून दूर करण्याची माहिती दिली होती,आगरकर

Kolhapur Bhishi Scam : विश्वासू मित्र म्हणून भिशी भरायला दिली, अन् ४० महिलांना पती, पत्नीने २५ लाखांना गंडवलं...; कोल्हापुरातील घटना

SCROLL FOR NEXT