Dhanashree-Chahal 
क्रीडा

"तो बात ऐसी है की..."; चहलच्या पत्नीची पोस्ट होतेय व्हायरल

विराज भागवत

धनश्रीने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला फोटोसह संदेश

T20 World Cup 2021: युएई आणि ओमानमध्ये होणाऱ्या टी२० विश्वचषक स्पर्धेसाठी काल भारतीय संघाची (Team India) घोषणा करण्यात आली. विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वाखालील टी२० संघात राहुल चहर (Rahul Chahar) याला संधी देण्यात आली. पण विशेष गोष्ट म्हणजे, अनुभवी फिरकीपटू युजवेंद्र चहलला (Yuzvendra Chahal) संघात स्थान देण्यात आले नाही. युजवेंद्र चहलची गेल्या काही वर्षातील कामगिरी अतिशय उल्लेखनीय आहे. असे असूनही त्याला संधी नाकारण्यात आली. त्यानंतर चहलची पत्नी धनश्री हिने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट टाकून चहलला धीर दिला.

भारतीय संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल याला संघात स्थान न मिळाल्याने तो काहीसा हिरमुसला असावा. त्यामुळे त्याची पत्नी धनश्री हिने त्याच्यासाठी एक खास पोस्ट इन्स्टाग्रामच्या स्टोरीवर टाकली. त्यात तिने चहलला धीर सोडू नकोस अशा आशयाचा संदेश दिला. "आई नेहमी म्हणते की ही (वाईट) वेळही एक दिवस निघून जाईल. ताठ मानेने जग. कारण प्रतिभा आणि चांगली कर्म कायम तुमची साथ देतात. त्यामुळे आता गोष्ट अशी आहे की हे वाईट दिवसही नक्कीच जातील आणि चांगले दिवस येतील. कारण देव महान आहे", अशा आशयाची इन्स्टा-स्टोरी तिने ठेवली.

Dhanashree-Insta-Story

म्हणून चहलला संघातून वगळलं - निवड समिती अध्यक्ष

"आम्ही युजवेंद्र चहलपेक्षाही राहुल चहरला पसंती देण्यामागचे मूळ कारण म्हणजे एका विशिष्ट प्रकारची फिरकी गोलंदाजी. आम्हाला बऱ्यापैकी वेगाने चेंडू वळवण्याची क्षमता राखणारा असा लेग स्पिनर हवा होता. त्यामुळे आम्ही युवा गोलंदाज राहुल चहर आणि वरूण चक्रवर्ती यांना संघात स्थान दिले. वरूण हा रहस्यमय गोलंदाजी करण्यात निष्णात आहे. त्याच्या हातावरून किंवा मनगटावरून तो टाकत असलेला चेंडू स्पिन होईल की गुगली असेल हे पटकन कळत नाही. या कारणास्तव या दोघांना चहलपेक्षाही जास्त पसंती देण्यात आली", असे BCCIचे निवड समिती अध्यक्ष चेतन शर्मा यांनी पत्रकारांशी संवाद साधताना स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Video : ''भारतात तुम्ही मला सुरक्षा देऊ शकत नाही का?'', राहुल गांधींची पोलिसांबरोबर बाचाबाची, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

Mumbai Health Report: राज्यात पावसाळी आजारांचा कहर; मुंबईत सर्वाधिक रुग्णांची नोंद

ब्रिटिशांच्या १८८१ व करवीर संस्थानच्या १९०२ च्या गॅझेटिरमध्ये मराठा व कुणबी एकच, तरीही मराठा समाजाला झगडावं लागतय; कोल्हापुरात आंदोलन पेटणार

Indira Ekadashi 2025: पूर्वजांना मुक्त करण्यासाठी महिलांनी काय करू नये, जाणून घ्या नियम

Latest Marathi News Updates : परतीच्या पावसामुळे पाणीपातळीत वाढ, मुंबईतील धरणांत ९८.८२ टक्के पाणीसाठा

SCROLL FOR NEXT