rishabh pant esakal
क्रीडा

‘चांगल्या परिस्थितीत...कॅप्टन्सी मिळताच पंतने व्यक्त केली खंत

दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध ५ सामन्यांच्या टी२० मालिकेसाठी भारतीय संघाच्या कर्णधारपदाची धुरा रिषभ पंत याच्याकडे सोपवण्यात आली आहे.

धनश्री ओतारी

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आजपासून पाच सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिका सुरु होणार आहे. कर्णधार केएल राहुल जायबंदी झाल्याने तो या सीरीजमधून बाहेर पडला आहे. या ५ सामन्यांच्या टी२० मालिकेसाठी भारतीय संघाच्या कर्णधारपदाची धुरा रिषभ पंत याच्याकडे सोपवण्यात आली आहे. कर्णधार पदाची जबाबदारी मिळताच पंतने खंत व्यक्त केली आहे.

पत्रकार परिषदेत पंतने हे पद मिळाल्यानंतर त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. “ही शानदार भावना आहे. खूप चांगल्या परिस्थितीत नाही, पण त्याच्यात मी आनंदी आहे. मी बीसीसीआयला धन्यवाद देऊ इच्छितो की, त्यांनी मला भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची संधी दिली. मी याचा पूर्ण फायदा उचलण्याचा प्रयत्न करेल. माझ्या सर्व हितचिंतकांना धन्यवाद, ज्यांनी माझ्या क्रिकेट कारकीर्दीतील चढ-उतारांमध्ये नेहमीच माझी साथ दिली. मी हाच आधार बनवत माझ्या कामगिरीत सुधारणा करण्याचा प्रयत्न करेल आणि आपल्या आयुष्याला प्रत्येक दिवशी चांगले बनवण्याचा प्रयत्न करेल अशी भावना त्याने यावेळी व्यक्त केली.

तसेच, आयपीएलमुळे मला नेतृत्व करण्यात मदत मिळाली. कारण, जेव्हा तुम्ही वारंवार हे करता, तेव्हा सुधारणा होते. मी त्यातीलच आहे, जो आपल्या चुकांमधून शिकतो आणि माझ्यामते येत्या काही दिवसांमध्ये मला यातून मदत होईल. असेही पंत यावेळी म्हणाला.

यासोबत त्याने द्रविड यांच्यासोबतचा अनुभव सांगितला. तो म्हणाला, त्यांचे जवळ असणेच सर्वात चांगल्या गोष्टींपैकी एक आहे. मी १९ वर्षांखालील क्रिकेटच्या दिवसांमध्ये त्यांच्यासोबत काम केले. त्यानंतर मी भारतीय संघात त्यांच्यासोबत काम केले. खूप अनुभवही आहे. ते एक दिग्गज क्रिकेटपटू आहेत. त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाले. त्यांच्याकडून खूप काही शिकायचे बाकी आहे. अशी भावनादेखील त्याने व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT