क्रीडा

मतभेद हेच मला वगळण्याचे कारण - पेस

सकाळवृत्तसेवा

बंगळूर - डेव्हिस करंडक स्पर्धेच्या 27व्या वर्षाच्या कारकिर्दीत संघात प्रथमच वगळण्यात आल्यानंतर लिअँडर पेस संतापला असून, त्याने कर्णधार महेश भूपतीवर संघ निवड निकषांचे उल्लंघन केल्याची टीका केली आहे.

उझबेकिस्तानविरुद्धच्या लढतीसाठी वगळण्यात आल्यानंतर पेस म्हणाला, 'भूपती आणि माझ्यातील बिघडलेले संबंध हेच मला वगळण्यामागील मुख्य कारण आहे. मला वगळण्यामागे कुठलेही ठोस कारण नाही. त्याने संघ निवड निकषांचे उल्लंघन केले आहे.''

पेस फॉर्ममध्ये नसल्याचे आणि सरावास उशिरा आल्याचे कारण कर्णधार भूपतीने दिले आहे. वास्तविक गेल्याच आठवड्यात पेसने मेक्‍सिको येथील चॅलेंजर टेनिस स्पर्धेत विजेतेपद मिळविले आहे. पेस म्हणाला, ""मी स्पर्धा खेळत असल्यामुळे उशिराने सरावासाठी दाखल झालो. तेव्हा माझ्याकडून चांगला खेळ होत होता. फॉर्म हाच जर संघ निवडीचा निकष असेल, तर माझे विजेतेपद फॉर्म दाखविण्यासाठी पुरेसे आहे. मुख्य म्हणजे फॉर्म हा काही कायम नसतो. तो सतत बदलत असतो. याचा विचार संघ निवडताना व्हायला हवा होता.''

कर्णधार या नात्याने संघ निवडीचा अधिकार भूपतीला आहे यात शंकाच नाही. पण, वैयक्तिक मतभेदावरून माझ्यावर अन्याय केला, तसा भविष्यात अन्य कुणावर करू नकोस, असा सल्ला देखील पेसने दिला.
भारतीय संघातून वगळल्यामुळे पेस चांगलाच संतापलेला होता. तो म्हणाला, 'मला मेक्‍सिकोवरून फोन करून संघातून वगळण्यासाठीच बोलावण्यात आले का? मला वगळल्याचा निरोप ते फोनवरूनही देऊ शकत होते. इतकी वर्षे खेळल्यानंतर अशी वागणूक मिळावी हे खेदजनक आहे. देशाविषयी आणि खेळाविषयी प्रेम असल्यामुळे मी मेक्‍सिकोवरून येथे तातडीने हजर झालो.''

भविष्याविषयी बोलताना पेस म्हणाला, 'एकदा वगळले म्हणून माझे टेनिस आणि देशाविषयीचे प्रेम कमी होणार नाही. वैयक्तिक पातळीवर मी जरूर निराश आहे. पण, त्याचा खेळावर परिणाम होऊ देणार नाही. मी मेहनत घेतच राहणार. मला खात्री आहे, एक दिवस माझा हाच ध्यास मला भारतासाठी खेळण्याची संधी मिळवून देईल.''

व्यावसायिक टेनिसपटू असलो, तरी जेव्हा देशासाठी खेळण्याचा प्रसंग येतो तेव्हा माझे प्राधान्य देशाकडूनच खेळायला असते. मला माझ्या कारकिर्दीकडे आणि मानांकनाकडे लक्ष द्यायचे असते, तर मी मेक्‍सिकोहून येथे आलोच नसतो.
- लिअँडर पेस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Outsourced Hiring: आउटसोर्स भरती म्हणजे युवकांचे शोषण; हायकोर्टाचा मोठा निर्णय, सरकारी भरती प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह

T20I Record: क्रोएशियाच्या २३ वर्षीय फलंदाजाचा अविश्वसनीय वर्ल्ड रेकॉर्ड; IPL सोडा पठ्ठ्याने ३ सामन्यांत जगाचे लक्ष वेधले

‘बाप्या’मधील राजश्री देशपांडेच्या लूकची चर्चा शैलजापासून शैलेशपर्यंतचा प्रवास ठरतोय खास!

Mumbai: महागाई वाढता वाढे! दरवाढीच्या तव्यावर भाजी-पोळी केंद्रे होरपळली, ग्राहकसंख्येत घट; व्यावसायिक चिंतेत

मुंबईत कचरा व्यवस्थापनाचे नवे नियम लागू! आता ४ प्रकारांत करावे लागणार कचऱ्याचे वर्गीकरण, नियम तोडल्यास कारवाई होणार

SCROLL FOR NEXT