Diksha Dagar Car Accident sakal
क्रीडा

Diksha Dagar Car Accident : पॅरिस ऑलिम्पिक दरम्यान वाईट बातमी... भारतीय गोल्फ खेळाडूचा कार अपघात

Deeksha Dagar Car Accident News Update : पॅरिस ऑलिम्पिक 2024 दरम्यान भारतासाठी वाईट बातमी येत आहे.

Kiran Mahanavar

Deeksha Dagar Car Accident during Paris Olympic : पॅरिस ऑलिम्पिक 2024 दरम्यान भारतासाठी वाईट बातमी येत आहे. भारतीय महिला गोल्फर दीक्षा डागरच्या कारला अपघात झाला आहे. या अपघातात दीक्षाला दुखापत झाली नसून तिची आई जखमी झाली आहे.

पॅरिस ऑलिंपिकमध्ये येत्या ७ ऑगस्टपासून भारताचे प्रतिनिधित्व करणारी दीक्षा डागर ही कार अपघातामधून बचावली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दीक्षा डागरच्या कारला पॅरिसमध्ये 30 जुलै रोजी संध्याकाळी अपघात झाला.

पॅरिसमध्ये दीक्षा आई, वडील व भावासह कारमधून प्रवास करीत असताना अपघात झाला. त्यामुळे तिच्या ऑलिंपिकमधील सहभागाबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले. मात्र, ती सुरक्षित असून ऑलिंपिकमध्येही सहभागी होणार असल्याची माहिती याप्रसंगी देण्यात आली.

पॅरिसमधील इंडिया हाऊसमधील कार्यक्रम आटोपून माघारी येत असताना दीक्षासह तिचे कुटुंब प्रवास करीत असलेल्या कारचा अपघात झाला; पण डागर कुटुंबीय सुरक्षित असल्याची माहिती भारतीय गोल्फ युनियनचे अध्यक्ष ब्रिजिंदर सिंग यांनी या वेळी दिली.

दीक्षाच्या आईला रुग्णालयात भरती करण्यात आले आहे; पण काही दिवसांनंतर तिला डिस्चार्ज देण्यात येणार आहे. दरम्यान, दीक्षा पॅरिस ऑलिंपिकमध्ये सहभागी होणार असून तिचा सहभाग असलेला प्रकार ७ ते १० ऑगस्टदरम्यान खेळवण्यात येणार आहे. हे तिचे दुसरे ऑलिंपिक असणार आहे.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंत (1 ऑगस्ट) 3 पदके जिंकली आहेत. हे तिघे ब्राँझ आहेत, जे नेमबाजीत मिळाले आहेत. मनू भाकरने 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये प्रथम कांस्यपदक मिळवले. त्यानंतर मनू भाकरनेही मिश्र सांघिक स्पर्धेत दुसरे कांस्य मिळवले. त्याच्यासोबत सरबज्योत सिंगही संघात होता. स्वप्नील कुसाळेने पुरुषांच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशन नेमबाजीत तिसरे कांस्यपदक जिंकले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today : नवीन वर्षात शेअर बाजारात तेजी! सेन्सेक्स 350 अंकांनी वाढला; TVS Motors चर्चेत; कोणते शेअर्स वाढले?

Pune News: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! पुण्याहून धावणार ६० नवीन रेल्वे; पुणे स्थानकावर सहा नवीन फलाट; गैरसाेय दूर होणार

Karnataka Election Survey : भारतातील निवडणुका मुक्त आणि निष्पक्ष, ईव्हीएमवर लोकांचा विश्वास वाढला; सरकारच्या राज्यव्यापी सर्वेक्षणातून स्पष्ट

Srirampur Crime: बंटी जहागीरदार हत्या प्रकरण! दोन मारेकऱ्यांना समृद्धी महामार्गावर बेड्या; थरारक घटना अन् काय घडलं?

Gold Rate Today : नववर्षात सोनं-चांदी चमकली! चांदी ४ हजारांनी महाग; काय आहे तुमच्या शहरातील आजचे भाव?

SCROLL FOR NEXT