Dilip Vengsarkar Statement About Picking Umran Malik instead Of Mohammed Siraj  esakal
क्रीडा

Umran Malik | मी असतो तर उमरान मलिकला घेतलं असतं : माजी निवडसमिती अध्यक्ष

अनिरुद्ध संकपाळ

Jasprit Bumrah Replacement Mohammed Siraj : बीसीसीआयने जसप्रीत बुमराह ऑस्ट्रेलियात होणारा टी 20 वर्ल्डकपला मुकणार असल्याची शक्यता अधीकच बळावली आहे. बीसीसीआयने दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या दोन टी 20 सामन्यांसाठी आपल्या संघात बदल केला असून पाठीच्या दुखापतीने त्रस्त असलेल्या जसप्रीत बुमराहच्या जागी मोहम्मद सिराज संघात आला आहे.

दरम्यान, भारताचे माजी खेळाडू दिलीप वेंगसरकर यांनी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी 20 वर्ल्डकपसाठी संघात उमरान मलिकला पसंती दर्शवली. त्यांनी जर मी असतो तर जम्मू काश्मीरचा वेगवान गोलंदाज उमरान मलिकला (Umran Malik) भारतीय संघात घेतलं असतं असे सांगितले.

वेंगसरकर यांनी स्पोर्टस्टारला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, 'हा कोणताही वेगळा विचार नाही. मी उमरान मलिकला त्याच्या वेगामुळे निवडले असते. एखाद्या व्यक्ती जो 150 किमी प्रतीतास वेगाने गोलंदाजी करतोय त्याला तुम्ही निवडलं पाहिजे. तुम्ही तो 130 किमी प्रतीतास गोलंदाजी करायला लागल्यानंतर त्याची निवड करून काय उपयोग. दुबईच्या पाटा विकेटवर तुम्हाला वेगवान गोलंदाजाची गरज होती. तुम्हाला अशा गोलंदाजाची गरज होती की जो फलंदाला वेगाने चकवा देऊ शकले.'

याचबरोबर दिलीप वेंगसरकर म्हणाले की, भारतीय संघात मोहम्मद शमी आणि श्रेयस अय्यरला देखील निवडायला हवे होते. श्रेयस अय्यर चांगल्या फॉर्ममध्ये आहे. मात्र त्याला संधी मिळाली नाही. मोहम्मद शमी आणि शुभमन गिल देखील संघात हवे होते. गिलने मला प्रभावित केले.' शुभमन गिलने नुकतेच ग्लॅमर्गनकडून काऊंटी पदार्पण केले. त्याने ससेक्सविरूद्ध एका सामन्यात शतक देखील ठोकले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump wishes Modi : ट्रम्प यांनी केला मोदींना फोन दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा अन् म्हणाले...

High Court Decision : उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! अवैध विवाह संबंधातून जन्मलेल्या मुलाला वडिलांच्या मालमत्तेत वाटा मिळण्याचा हक्क

Athletics Championships: छत्रपती शिवाजी महाराज की जय! चीनमध्ये सर्वेश कुशारेची जागतिक मैदानी स्पर्धेत अभिमानास्पद कामगिरी

Israel-Gaza War: इस्राईलकडून गाझा शहरात लष्करी कारवाईला सुरुवात; नागरिकांना दक्षिणेकडे निघून जाण्याचं आवाहन

Devendra Fadnavis: ''मी शंभर रुपये द्यायला तयार आहे, पण...'' उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन फडणवीसांचं आवाहन

SCROLL FOR NEXT