Dinesh-Karthik-Dipika-Twins-Boys
Dinesh-Karthik-Dipika-Twins-Boys 
क्रीडा

दिनेश कार्तिक झाला जुळ्यांचा बाबा; मुलांची नावं माहित्येत?

विराज भागवत

कार्तिक अन् पत्नी दिपिका पल्लीकलने सोशल मिडियावर केला फोटो पोस्ट | Dinesh Karthik and Dipika Pallikal

Dinesh Karthik and Dipika Pallikal welcome twins : भारताचा अनुभवी क्रिकेटपटू दिनेश कार्तिक आणि त्याची पत्नी स्टार स्कॅशपटू दिपिका पल्लीकल यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून एक गोड बातमी दिली. हे दोघे आई-बाबा झाले असून दिपिकाने दोन जुळ्या गोंडस मुलांना जन्म दिला. कार्तिकच्या घरी असलेल्या कुत्र्याच्या पिल्लाला कार्तिक पती-पत्नी आपल्या आपत्याप्रमाणेच मानतात. त्यामुळे जुळ्या मुलांच्या आगमनानंतर कार्तिकने पोस्टमध्ये, 'आज आम्ही ३ चे ५ झालो', असा गोड संदेश लिहिला आणि एक गोंडस फोटो पोस्ट केला.

मुलांच्या नावांचीही केली ऑनलाईन घोषणा

दिनेश कार्तिकने आपल्या सोशल मिडियावरून ही गोड बातमी आपल्या चाहत्यांना दिली. त्यासोबतच त्याने आपल्या मुलांची नावंही सांगून टाकली. कबीर पल्लीकल कार्तिक आणि झियान पल्लीकल कार्तिक अशी या दोन मुलांची नावं असल्याचं त्याने ट्वीटमध्ये सांगितलं.

कार्तिकने पहिल्या पत्नीपासून विभक्त झाल्यानंतर २०१३ मध्ये दिपिका पल्लीकल हिच्याशी विवाहगाठ बांधली. त्यानंतर ते दोघे सोशल मिडियावर कायमच अँक्टिव्ह होते. देशात आणि विदेशात भटकंती करतानाचे अनेक फोटो दोघेही पोस्ट करत होते. मात्र, आज या दोघांनी आपल्या चाहत्यांना सर्वोच्च आनंदाची बातमी दिली. या बातमीनंतर अनेकांनी त्याचं अभिनंदनदेखील केलं.विजय

दरम्यान, पत्नी दिपिकाच्या बाळंतपणामुळे दिनेश कार्तिकने काही दिवसांची पितृत्व रजा घेतली आहे. सैयद मुश्ताक अली टी२० क्रिकेट स्पर्धेत कार्तिक तामिळनाडूचे नेतृत्व करत आहे. पण त्याच्या रजेमुळे आता काही सामन्यांसाठी टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू विजय शंकर तामिळनाडूचं कर्णधारपद भूषवणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shrirang Barne: "अजितदादांच्या काही कार्यकर्त्यांनी माझा प्रचारच केला नाही"; श्रीरंग बारणेंची खदखद

PM Modi: PM मोदींचा राजकीय वारस कोण? अनेक दिवसांपासून सुरू होता वाद

Mumbai Indians: 'निराशाजनक सिजन होता, पण...', नीता अंबांनीचा मुंबईच्या कामगिरीबद्दल बोलताना रोहित-हार्दिकलाही खास मेसेज

Latest Marathi News Live Update: बारामतीत बारावीचा निकाल 96.32 टक्के.....

Loksabha Election: महाराष्ट्र सर्वात मागे, लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाची आकडेवारी समोर

SCROLL FOR NEXT