dinesh karthik sakal
क्रीडा

Asia Cup 2022 : दिनेश कार्तिकने 'या' युवा खेळाडूचे करिअर केले उद्ध्वस्त

निवडकर्त्यांनी दिनेश कार्तिकला आशिया चषकासाठी भारतीय संघात संधी दिली आहे, परंतु युवा या खेळाडूकडे दुर्लक्ष करण्यात आले.

Kiran Mahanavar

Dinesh kKarthik Indian Team Asia Cup 2022 : भारतीय संघात आशिया चषकासाठी निवडकर्त्यांनी अनेक दिग्गज खेळाडूंना संधी दिली आहे. दिनेश कार्तिकने आयपीएल 2022 मध्ये दणका दाखवून टीम इंडियात पुनरागमन केले, मात्र 37 वर्षीय दिनेश कार्तिकमुळे युवा खेळाडूला संधी मिळत नाहीये. निवडकर्त्यांनी 37 वर्षीय दिनेश कार्तिकला आशिया चषकासाठी भारतीय संघात संधी दिली आहे, परंतु युवा संजू सॅमसनकडे दुर्लक्ष करण्यात आले.

संजू सॅमसन चांगलाच फॉर्मात आहे. वेस्ट इंडिज आणि आयर्लंड दौऱ्यावर त्याने सर्वोत्तम खेळ दाखवला. आयर्लंड दौऱ्यावर संजूने ओपनिंग करताना 77 धावांची तुफानी खेळी केली होती. संजूने या वर्षी आतापर्यंत T20I मध्ये सहा सामन्यांच्या पाच डावात 44.75 च्या सरासरीने आणि 158.40 च्या स्ट्राईक रेटने 179 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून अर्धशतकही झळकले आहे. आयपीएल 2022 मध्ये संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सने प्लेऑफपर्यंत मजल मारली. निवडकर्त्यांनी ऋषभ पंत आणि ईशान किशनला जितक्या संधी दिल्या, तितक्या संधी संजू सॅमसनला दिल्या नाहीत. आता पुन्हा एकदा मोठ्या स्पर्धेपूर्वी त्याच्याकडे दुर्लक्ष झाले.

संजू सॅमसनने भारतीय संघासाठी अनेक सामने स्वबळावर जिंकले आहेत. त्याने टीम इंडियासाठी 4 एकदिवसीय सामन्यांमध्ये 118 धावा आणि 16 टी-20 सामन्यांमध्ये 296 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये आयर्लंडविरुद्धच्या 77 धावांच्या खेळीचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : भीषण अपघात! भरधाव येणाऱ्या मॅजिक व्हॅनची ट्रकला धडक, नऊ जणांचा जागीच मृत्यू

सायली-प्रिया दोघीही आई होणार! ठरलं तर मग मालिकेत मोठा ट्वीस्ट, प्रोमो पाहून नेटकरी म्हणाले...

Ghodegaon Accident: घोडेगाव–भीमाशंकर रस्त्यावर भीषण अपघात; समोरासमोर धडकेत रिक्षा चालकाचा मृत्यू, घोडेगाव परिसरात हळहळ..

Riyan Parag:'... तर आम्ही प्लेऑफमध्ये पोहचणार नाही', दिल्लीविरुद्धच्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाला रियान पराग?

राज्यातील पुन्हा निवडणुकीची रणधुमाळी, विधानपरिषदेच्या १६ जागांसाठी निवडणूक जाहीर, कधी होणार मतदान?

SCROLL FOR NEXT