Rinku Singh & Abhishek Nayar esakal
क्रीडा

Rinku Singh & Abhishek Nayar : फक्त वेळ येऊ दे मग बघ... मुंबईकर क्रिकेटपटूने कार्तिकला रिंकूबद्दल असं काय सांगितलं होतं?

Rinku Singh and Abhishek Nair : 5 T20 series between India and Australia...

अनिरुद्ध संकपाळ

Rinku Singh & Abhishek Nayar :

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 5 टी 20 सामन्यांची मालिका 23 नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे. पहिला सामना विशाखापट्टणम येथे खेळवण्यात आला. जरी काही दिवसांपूर्वीच झालेल्या वनडे वर्ल्डकपच्या फायनलमध्ये दोन्ही देशातील सामना फारसा रंगला नसला तरी टी 20 मालिकेतील पहिल्याच सामन्यात त्याची कसर भरून निघाली.

ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी 209 धावांचे आव्हान ठेवले होते. भारताने हे आव्हान शेवटच्या चेंडूपर्यंत झुंज देत पार केले. भारताने 19.5 षटकात 8 बाद 209 धावा केल्या.

या सामन्यात काळजीवाहू कर्णधार सूर्यकुमार यादवने (42 चेंडूत 80 धावा) जरी झंजावाती खेळी केली असली तरी विजयावर शिक्कामोर्तब मात्र डावखुऱ्या रिंकू सिंहनेच केले. रिंकू सिंहने शेवटच्या चेंडूपर्यंत झुंज ते 14 चेंडूत नाबाद 22 धावा केल्या.

रिंकूच्या या खेळीनंतर भारताचा माजी खेळाडू दिनेश कार्तिकची एक पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये दिनेशने भारताचा माजी खेळाडू आणि मुंबईकर असलेल्या अभिषेक नायरबद्दल बरंच काही बोलला आहे.

दिनेश कार्तिक आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहितो की, 'सध्या ह्रदयस्पर्शी आणि समाधान देणारा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अभिषेक नायर आणि रिंकू सिंह यांच्यातील नातं हे 2018 मध्ये सुरू झालं होतं. त्यावेळी ते दोघेही केकेआरशी जोडले गेले होते.

अभिषेक नायर कायम रिंकूमध्ये किती क्षमता आहे हे मला कायम सांगायचा. कायम म्हणायचा की फक्त वेळ येऊ दे मग बघ तो नक्की काहीतरी खास करून दाखवणार.

अलिगडसारख्या छोट्या शहरातून येणाऱ्या रिंकूसाठी फक्त त्यानं मोठा विचार करणं गरजेचं होतं. हा बदल जेव्हा नायर रिंकूसोबत काम करत होता त्यावेळी आला. त्यांनी त्याच्या डेथ ओव्हरमधील स्फोटक फलंदाजी करण्याच्या क्षमतेवर काम केलं.'

दिनेश कार्तिकने केकेआरमधील रिंकू आणि नायर यांचा एक किस्सा देखील सांगितला. तो म्हणाला, 'रिंकूला लिगामेंट इंज्युरी झाली होती. मात्र नायरने व्यंकी मैसूर सरांना रिंकूला संघासोबत प्रवास करण्याची परवानगी देण्याबाबत मनवलं. तो आयपीएलनंतर दुखापतीतून सावरण्यासाठी अनेक महिने नायरच्या घरी राहिला. त्यावेळी देखील नायर रिंकूच्या फलंदाजीवर काम करत होता. त्याने देशांतर्गत स्पर्धेत धुमाकूळ घातला.

नायर आणि केकेआरने एक मॅच विनर फिनिशर तयार केला. आज हा फोटो पाहताना मला असं वाटलं की कोच म्हणून नायरची उंची वाढली आहे. त्याला रिंकूच्या कामगिरीनंतर वाटणारा आनंद तो इतर जगासोबत वाटून घेऊ शकतो.'

तुमचा एक विद्यार्थी जागतिक स्तरावर दमदार कामगिरी करतोय त्यावेळी ज्या भावना तुमच्या मनात असतात त्या खूप वेगळ्या आणि स्वप्नवत असतात. हा क्षण याची देही याची डोळा पाहण्याचं भाग्य मला लाभलं!

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs ZIM: कसोटी क्रिकेटला मिळावा नवा 'त्रिशतकवीर'! द. आफ्रिकेच्या कर्णधाराने गोलंदाजांना झोडपत नोंदवले वर्ल्ड रेकॉर्ड

Stock market News : ‘MRF’ स्टॉकशी पुन्हा बरोबरी केली ‘या’ शेअरने! ; 3 रुपयांवरून थेट 300000 पर्यंत वाढली होती किंमत अन् आता...

राम कपूरच्या 'मिस्त्री' मध्ये झळकतोय मराठमोळा अभिनेता; मराठीत दिलाय कोट्यवधींचा सिनेमा

Latest Maharashtra News Updates : नाशिकमध्ये गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ

Thane News: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून विद्यार्थी पडले, दोन मुले गंभीर जखमी; ठाण्यातील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT