Dinesh Karthik Prediction IND vs AUS 1st Test  esakal
क्रीडा

Dinesh Karthik : समालोचक दिनेश कार्तिकची भविष्यवाणी ठरली खरी; मार्क वॉ हरला DK जिंकला!

अनिरुद्ध संकपाळ

Dinesh Karthik Prediction IND vs AUS 1st Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटीत भारताने कांगारूंचा 1 डाव आणि 132 धावांनी पराभव केला. भारताने प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाला पहिल्याच दिवशी 177 धावात गुंडाळले. त्यानंतर भारताने आपल्या पहिल्या डावात तब्बल 400 धावांचा डोंगर उभारला.

पहिल्या डावात 223 धावांची आघाडी घेतल्यानंतर भारताने ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 91 धावात संपवत सामना एक डाव आणि 132 धावांनी खिशात टाकला. भारताने अडीच दिवस चाललेल्या सामन्यात फक्त एकदाच फलंदाजी केली.

दिनेश कार्तिक भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटीत विकेट्स मागे नाही तर माईकच्या मागे होता. त्याने पहिल्याच दिवशी एक मोठी आणि बोल्ड भविष्यवाणी केली होती. त्याने मार्क वॉ बरोबर झालेल्या शाब्दिक द्वंद्वावेळी भारत या सामन्यात फक्त एकदाच फलंदाजी करेल असे सांगितले होते. यानंतर मार्क वॉ चांगलाच लाल झाला होता.

अशी झाली दिनेश कार्तिक अन् मार्क वॉमधील शाब्दिक चकमक

दिनेश कार्तिक : मला वाटते की भारत कसोटी सामन्यात फक्त एकदाच फलंदाजी करेल.

मार्क वॉ : डीके आम्ही त्याबद्दल पाहू, आम्ही त्याबद्दल पाहू.

दिनेश कार्तिक : माझे शब्द लक्षात ठेवा.

मार्क वॉ : किती वेळ झाली आहे. तीन वाजून पाच मिनिटे. मी माझ्या डायरीत लिहीन. तो बरोबर असू शकतो. हे सोपे होणार नाही, उद्यानात फेरफटका मारला जाणार नाही.

दिनेश कार्तिक : परंतु त्याच वेळी, ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी जशी फलंदाजी केली तितकंही कठीण नाही.

मार्क वॉ : मी एवढेच म्हणतो की दोन्ही बाजूंनी फलंदाजी करेपर्यंत खेळपट्टीचा निकाल लावू नका. गोष्टी कशा उलगडतात ते पाहूया. हे एक मोठे सत्र आहे, ऑस्ट्रेलिया भारताला सामन्यावर पकड निर्माम करू देणार नाही. हे भारतीय कसोटी फलंदाज काही ऑस्ट्रेलियन खेळाडूंइतके चांगले नाहीत. मी 60 च्या सरासरीने दोन फलंदाजही पाहिले नाहीत.

दिनेश कार्तिक : बरं, भारतात फक्त एक होता, सरासरी 60.

मार्क वॉ : रोहित शर्मा क्लास प्लेयर, विराट कोहली वर्ल्ड क्लास, पुजारा संघातील थॉर.

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केलेल्या कांगारूंचा पहिला डाव 177 धावात संपवला. त्यानंतर आपल्या पहिल्या डावात 400 धावांचा डोंगर उभारत पहिल्या डावात 223 धावांची भक्कम आघाडी घेतली. यानंतर कांगारूंनचा दुसरा डाव 91 धावात संपवत दुसऱ्यांदा फलंदाजी करण्याची तसदी घेतली नाही. विशेष म्हणजे पहिल्या डावात कांगारूंनी 64 षटके तर धरला तर दुसऱ्या डावात षटकेच खेळू शकले.

भारताकडून दुसऱ्या डावात अश्विनने 5 विकेट्स घेतल्या तर रविंद्र जडेजाने त्याला विकेट्स घेत चांगली साथ दिली. फलंदाजीत बोलायचे झाले तर रोहित शर्माने सर्वाधिक 120 धावा तर अक्षर पटेलने 84 आणि रविंद्र जडेजाने 70 धावांचे योगदान दिले.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

Igatpuri Tunnel Latest Update : समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! इगतपुरी बोगदा 'या' वेळेत बंद राहणार, काय आहे कारण?

Marathi News Live Updates : सुशिक्षित पूर्वज असल्याने आदिवासी दावा नाकारता येणार नाही, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

September 1 Rule Changes 2026 : सप्टेंबर १ तारखेपासून बदलणार ५ महत्त्वाचे नियम; सामान्यांच्या खिशावर परिणाम, LPG सिलिंडरपासून कारच्या किमतीपर्यंत मोठे बदल

SCROLL FOR NEXT