Dinesh Karthik says Ravindra Jadeja Not That Reckless Kid Anymore esakal
क्रीडा

'तो आता निष्काळजी मुलगा राहिला नाही' असं कार्तिक कोणाला म्हणाला?

अनिरुद्ध संकपाळ

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (India vs South Africa) भारताच्या मधळ्या फळीला फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही. त्यामुळे भारताला तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका ३ - ० अशी गमवावी लागली. दरम्यान, भारताचा माजी विकेटकिपर बॅट्समन दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) रविंद्र जडेजासारख्या (Ravindra Jadeja) खेळाडूची कमतरता आपल्याला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणवली असे मत मांडले. (Dinesh Karthik says Ravindra Jadeja Not That Reckless Kid Anymore)

दिनेश कार्तिक रविंद्र जडेजाबद्दल (Ravindra Jadeja) बोलता म्हणाला की, जडेजा आपल्या कारकिर्दिच्या सुरूवातीच्या दिवसांमध्ये एक निष्काळजी मुलगा होता. आता तो तसा राहिलेला नाही. तो आता हुशारीने फलंदाजी (Intelligent Batting) करतो. विशेष करून मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये (White Ball Cricket) तो भारतासाठी ६ व्या किंवा ५ व्या क्रमांकावर देखील फलंदाजी करू शकतो.

कार्तिक जडेजाबद्दल म्हणाला की, 'जडेजा आता सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी सज्ज आहे. तो चांगली फलंदाजी करत आहे तो पाचव्या क्रमांकावर देखील फलंदाजी करू शकतो. तो आता त्याची बुद्धी वापरत आहे. तो आता एक निष्काळजी मुलगा राहिलेला नाही. तो आता आपल्या फलंदाजीने संघाला विजय मिळवून देऊ शकतो. मयार्दित क्रिकेटमध्ये (ODI Cricket) त्याची फलंदाजी ही त्याची जमेची बाजू आहे.'

रविंद्र जडेजा सध्या दुखापतीमुळे (Ravindra Jadeja Injury) आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. त्याच्या उजव्या हाताला न्यूझीलंड विरूद्धच्या पहिल्या कसोटीदरम्यान दुखापत झाली होती. भारताने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर कसोटी पाठोपाठ एकदिवसीय सामन्यांची मालिका देखील गमावली. आता भारतीय संघ मायदेशात वेस्ट इंडीज विरूद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेत जोरदार पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT