Dinesh Karthik sakal
क्रीडा

Dinesh Karthik : 2 बाॅलमध्येच संपवली मॅच; परफेक्ट फिनिशर म्हणाला, मी कोणतंही श्रेय...

दिनेश कार्तिक सामना संपल्यानंतर पत्रकार परिषदेत म्हणाला 'अहो सर मी कोणतेही श्रेय...'

Kiran Mahanavar

Dinesh Karthik : भारताने दुसऱ्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 6 विकेट राखून पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. भारताच्या या विजयात कर्णधार रोहित शर्माने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. रोहितने 20 चेंडूत नाबाद 46 धावांची नाबाद खेळी खेळली. दिनेश कार्तिकने 2 चेंडूत 10 धावा करून सामना जिंकून दिला. सामना संपल्यानंतर पत्रकार परिषदेत कार्तिकला याबाबत विचारले असता तो म्हणाला, अहो सर मी कोणतेही श्रेय घेत नाही.

पत्रकार परिषदेत दिनेश कार्तिक म्हणाला, अहो मी कोणतेही श्रेय घेतले नाही सर, रोहित शर्माने अप्रतिम फलंदाजी केली. मला शेवटचे दोन चेंडू मिळाले. नवीन चेंडूने त्या विकेटवर तो शॉट खेळणे जागतिक दर्जाच्या गोलंदाजांना सोपे नसते. रोहित शर्मा हा भारतीय क्रिकेटमध्येच नव्हे तर जागतिक क्रिकेटमध्ये किती मोठा खेळाडू आहे, हे यावरून दिसून येते. त्याच्याकडे वेगवान गोलंदाजांचा चेंडू खेळण्याची खूप चांगली क्षमता आहे ज्यामुळे तो खास बनतो.

दिनेश कार्तिक पुढे म्हणाला, आज आम्हाला चार गोलंदाजांची गरज होती कारण एक गोलंदाज जास्तीत जास्त दोन षटके टाकू शकत होता. हार्दिक पांड्या प्लेइंग इलेव्हनमध्ये असताना टीममध्ये बराच समतोल असल्याचं दिसून येते. जागतिक क्रिकेटमध्ये संघाला असा समतोल साधणारे फार कमी खेळाडू आहेत. अक्षर पटेलही आता याच मार्गावर आहे. ऋषभ पंत आज खेळला, जरी त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही.

पावसाने व्यत्यय आणलेल्या या 8 षटकांच्या सामन्यात नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन संघाने आठ षटकांत 5 गडी गमावून 90 धावा केल्या. मॅथ्यू वेडने सर्वाधिक 43 धावांची नाबाद खेळी खेळली. भारताकडून अक्षर पटेलने सर्वाधिक दोन बळी घेतले.

प्रत्युत्तर भारतीय संघाने 4 चेंडू बाकी असताना 6 विकेट्स राखून सामना जिंकला. रोहित शर्माने 20 चेंडूत नाबाद 46 धावा केल्या. अखेरीस दिनेश कार्तिक 2 चेंडूत 10 धावा करून नाबाद राहिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam Water Release : कोयना धरणातून 3983 क्युसेक विसर्ग; कृष्णा नदीची पातळी वाढणार, आज सायंकाळपर्यंत पाणी पोहोचणार सांगलीत

Xiaomi 18 Pro Series होणार लाँच! 8500mAh बॅटरी, ड्युअल 200MP Leica कॅमेरा; पाहा नव्या फ्लॅगशिपचे भन्नाट फीचर्स!

Mumbai Water Metro: मुंबई वॉटर मेट्रोसाठी समुद्रतळाचा मोठा अडथळा; खडकाळ भागात ‘रॉक ड्रेजिंग’, २५० किमी जलमार्गांचा विकास

Marathi News Live Updates : छात्रों की गूंज' हा पुढील कार्यक्रम चेन्नईमध्ये

Thane News: ठाण्यात मध्यरात्री तरुणांचा जीवघेणा थरार! भरधाव कारच्या बोनेटवर बसून स्टंटबाजी, Viral Videoमुळे खळबळ

SCROLL FOR NEXT