Djokovic vs Alcaraz French Open semifinal sakal
क्रीडा

French Open : आज टेनिस विश्‍वातील नव्या पर्वाची नांदी? जोकोविच-अल्काराझ उपांत्य फेरीत लढणार

सकाळ ऑनलाईन टीम

Djokovic vs Alcaraz French Open semifinal : सर्वाधिक २२ ग्रँडस्लॅम जिंकलेला नोवाक जोकोविच आणि एक ग्रॅंडस्लॅम विजेता कार्लोस अल्काराझ यांच्यामध्ये आज फ्रेंच ओपन टेनिस ग्रँडस्लॅम पुरुष एकेरीचा उपांत्य फेरीचा सामना रंगणार आहे. ३६ वर्षीय जोकोविच व २० वर्षीय अल्काराझ यांच्यामधील ही लढत नव्या युगाची नांदी ठरणार का, असा प्रश्‍न याप्रसंगी निर्माण झाला आहे.

रॉजर फेडररने आंतरराष्ट्रीय टेनिसमधून निवृत्ती घेतली. राफेल नदाल दुखापतीमुळे या स्पर्धेमध्ये खेळू शकलेला नाही. त्याचे पुनरागमन पुढल्या वर्षी होण्याचे संकेत मिळाले आहेत. याच पार्श्वभूमीवर जोकोविचवर ‘बिग थ्री’चे वर्चस्व कायम राखण्याची जबाबदारी आहे. स्पेनच्या अल्काराझकडे टेनिसच्या या युगातील नवा तारा म्हणून बघितले जात आहे. त्यामुळे उद्या (ता. ९) होणाऱ्या या लढतीकडे तमाम टेनिसप्रेमींच्या नजरा खिळल्या आहेत.

इतिहास युवा खेळाडूच्या बाजूने

नोवाक जोकोविच-कार्लोस अल्काराझ यांच्यामध्ये आतापर्यंत एक लढत पार पडली आहे. २०२२ मध्ये माद्रिद ओपन या स्पर्धेमध्ये ते एकमेकांसमोर उभे ठाकले होते. या लढतीत अल्काराझ याने बाजी मारली. अल्काराझ याने ही लढत ६-७, ७-५, ७-६ अशी जिंकली.

तुम्हाला सर्वोत्तम व्हायचे असेल तर तुम्हाला अव्वल दर्जाचा खेळ करणाऱ्या खेळाडूला हरवावेच लागते. कार्लोस अल्काराझ हा अप्रतिम खेळ करीत आहे. त्याला पराभूत करायला नक्कीच आवडेल. टेनिसकोर्टवर खेळताना त्याची तीव्रता त्याच्याच देशातील राफेल नदालसारखी जाणवते. - नोवाक जोकोविच

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

karoline leavitt ट्रम्प यांच्या २८ वर्षीय अधिकारी तरुणीनं ६० वर्षीय व्यक्तीशी का केलं लग्न? स्वत:च केला खुलासा

Heart Blockage: हार्ट ब्लॉकेज कमी करतात ‘या’ 3 भाज्या, डॉक्टरही देतात रोज खाण्याचा सल्ला

Latest Marathi News Update LIVE : थार आणि कारचा भीषण अपघात, ५०० फूट खोल दरीत कार कोसळली, ६ पैकी ४ जणांचे मृतदेह सापडले, २ अजूनही बेपत्ता

kolhapur kagal politics: मुश्रीफ -राजे गट एकत्र आल्यानंतर, मंडलिकांनी वेगळी चाल खेळली; संजय घाटगेंची भेट घेत केली बंद खोलीत चर्चा

Swarnagiri Temple Tourism: स्वर्गासारखे तेजस्वी ‘स्वर्णगिरी’ मंदिर पाहताक्षणी मन मंत्रमुग्ध होते! जाणून घ्या प्रवासाचा संपूर्ण मार्ग

SCROLL FOR NEXT