क्रीडा

सलामीलाच जोकोविचचा विजयासाठी संघर्ष ; ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस क्रोएशियाच्या १८ वर्षीय डिनो प्रिझमिकची कडवी झुंज

जोकोविच याने ही लढत ६-२, ६-७, ६-३, ६-४ अशी चार सेटमध्ये जिंकली आणि पुढल्या फेरीत प्रवेश केला. डिनो याने पात्रता फेरीमधून मुख्य फेरीत प्रवेश केला होता.

सकाळ वृत्तसेवा

मेलबर्न : सर्वाधिक २४ ग्रँडस्लॅम जिंकलेल्या नोवाक जोकोविच याला ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस ग्रँडस्लॅमच्या पुरुष एकेरीतील पहिल्या फेरीच्या लढतीत विजयासाठी संघर्ष करावा लागला. क्रोएशियाच्या १८ वर्षीय डिनो प्रिझमिक याने त्याला कडवी झुंज दिली. मात्र जोकोविच याने ही लढत ६-२, ६-७, ६-३, ६-४ अशी चार सेटमध्ये जिंकली आणि पुढल्या फेरीत प्रवेश केला. डिनो याने पात्रता फेरीमधून मुख्य फेरीत प्रवेश केला होता.

नोवाक जोकोविच हा २००५मध्ये पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियन ओपन या स्पर्धेमध्ये सहभागी झाला; अन्‌ त्याच वर्षी ऑगस्ट महिन्यात डिनो प्रिझमिक याचा जन्म झाला. आता त्याच प्रिझमिक याने टेनिसविश्‍वातील महान खेळाडू जोकोविचला विजयासाठी झुंजवले. पहिला सेट जोकोविचने ६-२ असा जिंकत आघाडी घेतली. त्यानंतर डिनो याने दुसरा सेट ७-६ असा जिंकत बरोबरी साधली. मात्र पुढील दोन सेटमध्ये जोकोविचने झोकात पुनरागमन केले. त्याने तिसरा सेट ६-३ असा आणि चौथा सेट ६-४ असा जिंकत सामना आपल्या नावावर केला.

नोवाक जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपनमधील ९०व्या विजयाला गवसणी घातली. त्याने हा विजय चार तास व एक मिनिटात मिळवला. तसेच गेल्या सहा वर्षांमध्ये तो येथे एकही सामना हरलेला नाही. तसेच या दरम्यान मेलबर्न येथील मानाच्या स्पर्धेत २८ सामन्यांत त्याला विजयावर मोहोर उमटवता आली आहे.

सबालेंका, सक्कारीचे विजय

दुसरी मानांकित अरिना सबालेंका व आठवी मानांकित मारिया सक्कारी या मानांकित टेनिसपटूंनी महिला एकेरीच्या लढतींत प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवत पुढे पाऊल टाकले. सबालेंका हिने इला सेईडेल हिच्यावर ६-०, ६-१ अशी सहज मात केली. सक्कारी हिलाही विजयासाठी फार कष्ट घ्यावे लागले नाही. तिने नाओ हिबिनो हिला ६-४, ६-१ असे पराभूत केले. सबालेंका हिने ५३ मिनिटांमध्ये, तर सक्कारी हिने एक तास व ११ मिनिटांमध्ये विजय संपादन केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT