DK Chanting By Fans During TPL In Front Of Murali Vijay Video Gone Viral ESAKAL
क्रीडा

Video : DK... DK... चा जयघोष करणाऱ्या प्रेक्षकांकडे पाहून मुरली विजयने जोडले हात

अनिरुद्ध संकपाळ

Murali Vijay : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील टी 20 मालिका 29 जुलैपासून सुरू होत आहे. यासाठी दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) वेस्ट इंडीजमध्ये दाखल झाला आहे. दरम्यान, भारतात देखील तामिळनाडू प्रीमियर लीग स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत भारतीय संघाकाडून खेळलेला मुरली विजय देखील खेळत आहे. त्याने या स्पर्धेत एक शतक देखील ठोकले आहे. दरम्यान, एका सामन्यावेळी मुरली विजय फिल्डिंग करताना प्रेक्षकांनी दिनेश कार्तिकच्या जयघोष सुरू केला. यावर विजयने देखील प्रेक्षकांकडे पाहत आपली प्रतिक्रिया दिली. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

तामिळनाडू प्रीमियर लीगच्या (TPL) एका सामन्यात मुरली विजय सीमारेषेवर फिल्डिंग करत होता. त्यावेळी चाहत्यांनी दिनेश कार्तिकच्या नावाचा जयघोष सुरू केला. चाहते DK..DK.. असे जोरजोराने ओरडू लागले. त्यानंतर मुरली विजयने प्रेक्षकांकडे पाहून टाळ्या वाजवण्याची अॅक्शन केली. त्यानंतर काही वेळाने त्याने सर्वांनी हात जोडले आणि काय करताय असे हावभावानेच विचारले.

दिनेश कार्तिकची पहिली पत्नी निकिता वंजाराचे मुरली विजय सोबत अफेअर सुरू होते. नंतर या दोघांनी लग्न देखील केले. त्यानंतर दिनेश कार्तिकने 2015 मध्ये स्क्वॉश खेळाडू दीपिका पल्लीकल सोबत लग्न केले. सध्या दिनेश कार्तिक भारतीय संघासोबत वेस्ट इंडीज दौऱ्यावर आहे. दिनेश कार्तिकने 2022 च्या आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करत भारतीय संघात पुनरागमन केले. दिनेश कार्तिकची फॅन फॉलोईंग मोठ्या प्रमाणात वाढली आहे. भारत वेस्ट इंडीजमध्ये 5 टी 20 सामन्यांची मालिका खेळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic Alert: आषाढी वारी पालखी आगमनादिवशी पुण्यात पालखी मार्गावरील वाहतूक तीन टप्प्यांत बंद

१५ व्या वर्षी इंग्लंडमध्ये ३ शतके, ८७८ धावा अन् २४ विकेट्स! वेंगसरकर क्रिकेट अकादमीचा पठ्ठ्या चमकला

Vasai Fort Risk: मुसळधार पावसाने वसई किल्ल्याला धोका; भुयारात पाणी साचले, भिंती-वास्‍तू धोकादायक

Kabaddi Awards: कबड्डी संघटनेचे पुरस्कार जाहीर; ‘सकाळ’च्या कडकालेंचाही सन्मान, तर पाटील, खटावकर यांना ‘जीवन गौरव’

Maharashtra Rain: सतर्कतेचा इशारा! महाराष्ट्रात पुढील ५ दिवस मुसळधार पावसाचा धोका; पण कुठे? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT