Doping Allegation Indian Women Rugby Player Antima Kumari Banned For 2 Years by NADA  esakal
क्रीडा

उत्तेजक द्रव्य सेवन प्रकरणी भारतीय महिला रग्बी खेळाडूवर बंदी

अनिरुद्ध संकपाळ

नवी दिल्ली : राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य समितीने (NADA) ने बिहारची महिला रग्बीपटू अंतिमा कुमारीवर दोन वर्षाची बंदी घातली आहे. भारतात बहुदा पहिल्यांदाच रग्बी खेळाडूला उत्तेजक द्रव्य सेवन प्रकरणी बंदीला सामेरे जावे लागणार आहे. अंतिमा कुमारी ही आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी शॉर्टलिस्ट झाली होती. नाडाला तिच्या शरिरात बंदी असलेले टॅमोक्सिफेन (Tamoxifen) द्रव्य आढळून आले होते. टॅमोक्सिफेन हार्मोन आणि मेटाबलिक मॉड्युलेटर म्हणून ओळखले जात. जागतिक उत्तेजन द्रव्य विरोधी समितीने (WADA) 2021 मध्ये या द्रव्याचा एस 4 अंतर्गत बंदी असलेल्या द्रव्यात समावेश केला होता. (Doping Allegation Indian Women Rugby Player Antima Kumari Banned For 2 Years by NADA)

अंतिमा ही विंगर (शेवटच्या ओळीतील शेवटची खेळाडू) म्हणून संघात खेळते. तिने नाडाच्या उत्तेजन द्रव्य विरोधी कलम 2.1 चा भंग केल्याचे आढून आले आहे. तिची 18 ऑक्टोबर 2021 ला राष्ट्रीय रग्बी संघाच्या सराव शिबीरावेळी भुवनेश्वरमध्ये चाचणी घेण्यात आली होती. तिचा 'अ' नमुना वाडाशी सल्लग्नित असलेल्या बेल्जीयममधील प्रयोगशाळेत पाठवण्यात आला होता. त्याचा अहवाल प्राप्त झाला असून त्यात मेटाबॉलाईट मेथॉक्सी हायड्रॉक्सी टॅमोक्सिफेन हे बंदी असलेले द्रव्य आढळून आले.

यानंतर अंतिमाला 12 डिसेंबर 2021 राजी नोटिस बजावण्यात आली. त्यावेळी तिच्यावर 30 डिसेंबरपासून तात्पुरत्या स्वरूपाची बंदी घालण्यात आली. दरम्यान, नाडाच्या रेकॉर्ड नुसार या खेळाडूने थेराप्युटिक यूज एक्झमशन (TUE) साठी अर्ज केल्याचे आढळून येत नाही. TUE अंतर्गत खेळाडूला उत्तेजक द्रव्य का घेतले याचे योग्य स्पष्टीकर देण्याची संधी दिली जाते.

दरम्यान, एडीडीपीच्या आदेशात 'टॅमोक्सिफेन हे उत्तेजक द्रव्य खेळाडूंच्या शरिरात कसं आढळून आलं याबाबत खेळाडूकडून याबाबत योग्य बचाव करण्यात आला नाही. त्यामुळे समिती खेळाडूवर दोन वर्षाची बंदी घालत आहे. बंदीचा कालावधी 30 डिसेंबर 2021 पासून सुरू होत आहे.' असा उल्लेख करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT