Wriddhiman Saha  sakal
क्रीडा

टीम इंडियातून वगळलेल्या साहाला पत्रकाराची धमकी; शेअर केला स्क्रीनशॉट

श्रीलंकेविरुद्ध कसोटी संघातून भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋद्धिमान साहाला डच्चू देण्यात आला.

सूरज यादव

श्रीलंकेविरुद्ध कसोटी संघातून भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋद्धिमान साहाला डच्चू देण्यात आला. यानंतर संघात निवड न झालेल्या साहाला धमक्यांचा सामना करावा लागत आहे. एका पत्रकाराने साहाला व्हॉटसअॅपवर धमकी दिली आहे. त्यानं याचा एक स्क्रीनशॉटसुद्धा शेअर केला आहे. मुलाखत देण्यासाठी पत्रकाराकडून धमकी दिली जात असल्याचा आरोप साहाने केला आहे.

साहाने शेअर केलेल्या स्क्रीनशॉटमध्ये पत्रकाराने त्याला मुलाखतीबाबत विचारल्याचं आणि शेवटी धमकी दिल्याचंही दिसतं. पत्रकार म्हणतो की, मला एक मुलाखत दिलीत तर चांगलं होईल. त्याला सिलेक्टर्सनी फक्त एक यष्टीरक्षक म्हणून निवडलं आहे. कोण बेस्ट आहे? तु ११ पत्रकारांना निवडण्याचा प्रयत्न केलास तो माझ्या मते योग्य नाही. त्याला निवड जे जास्त मदत करू शकतील. तु कॉल केला नाहीस. आता मी तुझी मुलाखत घेणार नाही आणि मी हे लक्षात ठेवेन असा इशाराही पत्रकाराने साहाला दिला आहे.

साहाने ट्विटरवर म्हटलं की, भारतीय क्रिकेटला दिलेल्या इतक्या योगदानानंतर एक तथाकथित 'सन्माननिय' पत्रकारामुळे मला अशा गोष्टींचा सामना करावा लागत आहे. इथूनच पत्रकारिता संपते असे उद्गार साहाने काढले आहेत.

साहाला श्रीलंकेविरुद्ध दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत संधी मिळाली नाही. यानंतर साहाने बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलींवर निशाणा साधला. त्यानं प्रश्न विचारला की,'सगळं इतक्यात कसं बदललं?' साहाने रणजी ट्रॉफीतून त्याचं नाव मागे घेण्यामागेही बरीच कारणं असल्याची चर्चा सुरु होती. तर शनिवारी साहाने म्हटलं की, गांगुलींनी त्याला आश्वासन दिलं होतं की टीम इंडियातील त्याच्या जागेबाबत त्यानं काळजी करू नये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI News: WhatsApp वर RBI चा मेसेज आला? खिशातील रुपया आता मोबाईलमध्ये! डिजिटल रुपया म्हणजे काय आणि तो कसा वापरायचा जाणून घ्या

Railway Ticket Booking: यूजर-फ्रेंडली डिझाइन, कमी स्टेप्स आणि फास्ट बुकिंग! IRCTC संकेतस्थळाचा कायापालट, कधी होणार सुरू?

Latest Marathi News Live Update : कामरगाव अप्पर तहसील कार्यालयाच्या मागणीसाठी नागरिक एकवटले

Jalna: वारकऱ्यांसाठी दहा वर्षांपासून अखंड जलसेवा; संदीप कंटुले यांच्याकडून माउलीच्या पालखीत टँकरद्वारे मोफत पाणी

IND vs ENG 1st ODI: ५-२-३-१... टीम इंडियाचा फॉर्म्युला ठरला; इंग्लंडला सव्याज परतफेड करणारी तगडी प्लेइंग इलेव्हन

SCROLL FOR NEXT