Dravid 
क्रीडा

दुबई बुद्धिबळ स्पर्धा : द्रविडने ग्रॅण्डमास्टरला रोखले 

सकाळवृत्तसेवा

नागपूर, ता. 3 : नागपूरचा फिडेमास्टर शैलेश द्रविडने दुबई खुल्या बुद्धिबळ स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत भारताचा ग्रॅण्डमास्टर व्ही. विष्णू प्रसन्नाला बरोबरीत रोखून सर्वांना आश्‍चर्याचा धक्‍का दिला. नागपूरच्याच आंतरराष्ट्रीय मास्टर रौनक साधवानी व महिला आंतरराष्ट्रीय मास्टर दिव्या देशमुखने विजयी मोहिम कायम ठेवत सलग दुसरा विजय नोंदविला. महिला चेसमास्टर मृदूल डेहनकरनेही स्पर्धेत पहिल्या विजयाची नोंद केली. 

दुबई चेस ऍण्ड कल्चरल क्‍लबतर्फे सुरू असलेल्या स्पर्धेत 22 व्या पटावर शैलेशने ग्रॅण्डमास्टर व्ही. विष्णू प्रसन्नाविरुद्ध उत्कृष्ट संरक्षण व आक्रमकतेच्या जोरावर महत्त्वपूर्ण अर्धा गुण वसूल केला. दोन फेऱ्यांमध्ये दीड गुणांची कमाई करणाऱ्या शैलेशची लढत तिसऱ्या फेरीत भारताचा आणखी एक ग्रॅण्डमास्टर देबाशिष दासविरुद्ध होणार आहे. रौनकनेही (दोन गुण) आगेकूच कायम ठेवत भारताचा फिडेमास्टर एल. आर. श्रीहरीला पराभूत केले. तिसऱ्या फेरीत रौनकपुढे भारताचा ग्रॅण्डमास्टर एस. पी. सेथुरामणचे आव्हान राहील. 

भारतीय बुद्धिबळपटूंच्या क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर झेप घेणाऱ्या दिव्यानेही सलग दुसरा विजय मिळविताना भारताच्या ओ. टी. अनिलकुमारला पराभूत केले. तिसऱ्या फेरीत दिव्याची लढत उझबेकिस्तानचा ग्रॅण्डमास्टर अब्दुसत्तोरोव्ह नोदिरबेकविरुद्ध होईल. पहिल्या फेरीत पराभूत झालेल्या मृदुलनेही यशस्वी "कमबॅक' करीत दुसऱ्या फेरीत पॅलेस्टाईनच्या कार्मेल जलघुमला मात दिली. मृदूलचा तिसरा सामना भारताचा आंतरराष्ट्रीय मास्टर आर. ऋत्विक राजाविरुद्ध होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Chairman Election : माझ्याकडूनच मोठी चूक झाली, मुलाला...; शशिकांत पाटील-चुयेकरांना अध्यक्ष करण्याचीही जबाबदारी आमचीच, हसन मुश्रीफ यांचं मोठं विधान

सब गोलमाल! पत्नी IPS, पती IAS, कुटुंबाच्या नावे ४० व्हिलांची खरेदी, भाडं वर्षाला २ कोटी; सरकारने केली कारवाई

राज्यातील चार आमदारांचा एकच मामा कोण! प्रतापसिंह पाटील यांच्या विजयानंतर राजन पाटील यांची राज्यभर चर्चा

Money Tips: शॉपिंग अन् खर्चाची घाई नको! पहिल्या पगारातून नेमकं काय करायचं?

अभिनेत्री प्रियदर्शिनी अडकली लग्नबंधनात; बॉयफ्रेंडसोबत गुपचूप बांधली लग्नगाठ, फोटो व्हायरल

SCROLL FOR NEXT